आरोग्य

मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाची स्थिती भयावह !

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे (Corona) नवीन आकडे दररोज एक नवा उच्चांक गाठताना दिसत आहेत. कोरोना प्रसाराचा हा वेग पाहाता बंगळुरूमधील (Bengaluru) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनं (IISC) असा अंदाज व्यक्त केला आहे, की मे महिन्याच्या अखेरपर्यंत हा आकडा 1.4 कोटीच्याही पुढे जाईल. कोरोनाच्या ट्रेंडवर नजर ठेवणाऱ्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, एप्रिलच्या मध्यापर्यंत कोरोना आपल्या पिकवर असू शकतो आणि अ‍ॅक्टिव्ह केसेस 7.3 लाखापर्यंत जाऊ शकतात. दरम्यान, एकीकडे कोरोनाबाबत गंभीर होत असताना राजकीय नेते मात्र लॉकडाऊनवरून चिखलफेक करण्यात मग्न असल्याचं दिसत आहे.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान कोरोनाचा प्रसार अधिक वेगानं होईल. मेअखेरपर्यंत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 20 लाखाहून अधिक होईल. शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, जर आतापासून लोकांनी कोरोना नियमांचं पालन केलं, मास्क लावलं सोशल डिस्टन्सिंगचे पालन केलं आणि लसीकऱणाची संख्या वाढवल्यास कोरोनाची वाढती संख्या आटोक्यात आणणं शक्य होईल. IISC चे प्रोफेसर शशिकुमार यांनी सांगितलं, की आतापर्यंत आम्ही जो अंदाज लावला आहे, तो कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या ट्रेंडवर आधारित आहे. आमच्या अंदाजानुसार एप्रिल अखेरपर्यंतच रुग्णांची संख्या 10.7 लाखापर्यंत पोहोचेल.

देशात एक दिवसात 90 हजारहून अधिक रुग्ण

देशात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत वेगानं पसरताना दिसत आहे. कोरोनाच्या भयावह स्थितीचा अंदाज याच गोष्टीवरुन लावला जाऊ शकतो की देशा एका दिवसात 90 हजारहून अधिक रूग्ण समोर येत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरात शनिवारी कोरोनाचे 92,943 नवे रूग्ण समोर आले आहेत.

पुण्यात कोरोनाच्या समुह संसर्गाला सुरुवात?

कोरोनाच्या पहिल्या लाटेत पुणे जिल्हा हॉटस्पॉट (Pune District Corona Hotspot) ठरला होता. त्यानंतर काही दिवसांनी चित्र बदललं आणि जिल्ह्यातील वाटचाल कोरोनामुक्तीकडे होऊ लागले. रुग्णसंख्या कमी झाल्याने अनेक कोव्हिड सेंटर्सही बंद करण्यात आली. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर झाली असून शनिवारी तर कोरोना रुग्णसंख्येने (Corona Patients) आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. पुणे जिल्ह्यात 3 एप्रिल रोजी तब्बल 10 हजाराहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी दिवसवभरात पुणे जिल्ह्यात तब्बल 10 हजार 827 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर फक्त पुणे शहरात 5 हजार 720 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये 2832 तर ग्रामीण भागात पहिल्यांदाच दीड हजारांवर रूग्णसंख्या झाली आहे. शनिवारी 66 कोरोना रुग्णांनी आपले प्रमाण गमावले आहेत. त्यामुळे पुण्यात कोरोनाचा समुह संसर्ग तर झाला नाही ना? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button