मेरिल लाइफ सायन्सेसकडून बायोरिसोर्बेबल स्कॅफॉल्ड, मेरेस१००- बीआरएसचे अनावरण
मुंबई – मेरिल लाइफ सायन्सेसने भारतात देशांतर्गत संशोधित आणि विकसित केलेल्या बायोरिसोर्बेबल स्कॅफॉल्ड (बीआरएस) मेरेस१००च्या अनावरणाची घोषणा केली. बायोरिसोर्बेबल स्कॅफॉल्ड हे बिगर मेटॅलिक, नॉन परमनंट मेश ट्यूब्स आहेत, ज्या स्टेंटसारख्या आहेत आणि नियमित अँजिओप्लास्टी प्रक्रियेद्वारे आधी बंद झालेली रक्तवाहिनी खुली झाल्याची खात्री झाल्यावर विरघळते. हा एक विशेष उपचार पर्याय आहे. तो रूग्णांच्या निश्चित संख्येवर योग्य उपचार करतो. तो सर्वोत्तम क्लिनिकल पद्धती तसेच क्लिनिकल संशोधन आणि दीर्घकालीन पुरावे यांची पूर्तता करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आणि क्रमवार पद्धतीने आणला जाईल.
सध्या मेरेस१०० चे भारतात १६ शहरांमध्ये अनावरण केले जात आहे. यात मुंबई, दिल्ली, गुरगाव, बंगळुरू, चेन्नई, पुणे, हैद्राबाद, अहमदाबाद, लखनऊ, चंदीगढ, मोहाली, जयपूर, कोची आणि एदाक्कड (केरळमध्ये), नागपूर आणि भुवनेश्वर यांचा समावेश आहे. मेरिल लाइफ सायन्सेसचे कॉर्पोरेट स्टॅटेजी विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजीव भट्ट म्हणाले की, ”आम्ही भारतात मेरेस १०० बीआरएस आणण्यासाठी तसेच योग्य उपचारांसह योग्य रूग्णांपर्यंत ते पोहोचेल याची खात्री करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही सर्वोत्तम क्लिनिकल पद्धती आणण्यासाठी क्रमवार हॉस्पिटल रोलआऊट आणू, केसेसना मदत करण्यासाठी आणि यशस्वी बायरिसोर्बेबल स्टेंट प्रत्यारोपणासाठी प्रोटोकॉलबाबत डॉक्टरांना शिक्षित करण्यासाठी टीमची नेमणूक करू. या उपाययोजनांद्वारे आम्ही रूग्णांसाठी सर्वोत्तम परिणाम साध्य करण्याच्या प्रयत्नात आहोत.”
ते पुढे म्हणाले की, “तसेच, बीआरएस उपचारांबाबत दीर्घकालीन संशोधनाला आधार म्हणून एक बहुराष्ट्रीय, बहुकेंद्री, यादृच्छिक क्लिनिकल चाचणी, मेरेथॉन आरसीटी देऊ, ज्यात मेरेस१०० ची तुलना पारंपरिक औषधे सोडणाऱ्या स्टेंट्ससोबत केली जाईल. सुमारे २००० रूग्णांची क्लिनिकल, अँजिओग्राफिक आणि ओसीटी इमेजिंग फॉलोअप्स सुमारे पाच वर्षांसाठी केले जातील आणि त्यातून बीआरएस थेरपीचे दीर्घकालीन क्लिनिकल पुरावे आणि त्याचे फायदे सिद्ध होतील. मेरिल लाइफ सायन्सेसकडून बीआरएस क्लिनिकल फोरमही तयार केला जाईल आणि त्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ञ येऊन सातत्याने एकमेकांना सुयोग्य रूग्ण निष्कर्षातील सर्वोत्तम पद्धतींची माहिती देतील.”
मेरेस१०० हा पहिलावहिला १०० मायक्रॉन थिन-स्ट्रट बीआरएस असून त्याची रचना कोरोनरी आर्टरी आजाराने ग्रस्त लोकांवरील उपचारासाठी केली गेली आहे. आजपर्यंत त्याला अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, रशिया, युरोप, कोरिया, चीन, ब्राझील आणि भारतातील एकूण १२ पेटंट देण्यात आले आहेत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चाचण्यांच्या बहुवर्षी सुरक्षा आणि कार्यक्षमता माहितीच्या आधाराद्वारे मेरेस १०० ला डीजीसीआय तसेच युरोपियन सीईची मान्यता मिळाली आहे. या चाचण्यांमध्ये प्रमुख अन्वेषक असलेले आघाडीचे भारतीय कार्डिओलॉजिस्ट आणि फोर्टिस एस्कॉर्टस् हेल्थ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. अशोक सेठ यांच्या नेतृत्वाखाली मेरेस-१ चा समावेश आहे. त्यातून पुढील पिढीच्या थिन स्ट्रट तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे फायदे स्पष्ट करण्यात आले आहेत.
कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस (सीव्हीडी) जसे कोरोनरी हार्ट डिसीज हे भारतातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. तरूण भारतीय पुरूषांमध्ये कोरोनरी हार्ट डिसीजच्या उद्भवाचे प्रमाण पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत दुप्पट आहे. तसेच, सीव्हीडीचा त्रास भारतीयांना युरोपियनांच्या तुलनेत किमान एक दशक आधी सुरू होतो हे सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध आहेत.
डॉ. प्रवीण चंद्र, अध्यक्ष- इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी, मेदांता- दि मेडिसिटी, गुरगाव भारत आणि सह प्रमुख अन्वेषक मेरेस-१ अभ्यास म्हणाले की, ”वैद्यकीय तंत्रज्ञानाने आजाराच्या घटना तसेच रूग्णांच्या अपूर्ण गरजांनुसार बदलणे गरजेचे आहे. भारतात आम्ही तरूण रूग्णांना, अगदी ३५ वर्षीय रूग्णांनाही रोगट किंवा तणावपूर्ण जीवनशैलीमुळे कोरोनरी आर्टरीचा आजार झाल्याचे निदान केले आहे. ज्येष्ठ रूग्ण ज्यांना कार्डिएक आजारही आहे, त्यांच्यातही विशेष समस्या दिसतात कारण त्यांच्या त्याच आर्टरीमध्ये सातत्याने गाठी आलेल्या दिसू शकतात. बायोरिसोर्बेबल स्कॅफॉल्ड हे कायमस्वरूपी मेटॅलिक स्टेंट्सच्या तुलनेत वेगळे आहेत. त्यात ते फक्त तात्पुरते स्कॅफोल्डिंग देतात आणि बरे होण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी औषध सोडतात. त्यानंतर स्कॅफॉल्ड रक्तवाहिनीत नैसर्गिकरित्या विरघळतो. योग्य रूग्ण आणि गाठ निवड केल्यावर बायोरिसोर्सेबल किंवा विरघळण्यायोग्य स्टेंट तंत्रज्ञानाद्वारे एक ब्लॉकेज बरा करण्यासाठी आवश्यक असलेल्या तात्पुरत्या होरायझनमधील दरी सांधली जाऊ शकते आणि मेटॅलिक स्टेंट प्रत्यारोपण कायमस्वरूपी केले जाऊ शकते.”