शिक्षण

बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : बारावी बोर्ड निकालासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वपूर्ण निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व राज्यांतील बोर्डांनी अंतर्गत मूल्यांकन कसं करणार याबाबत योजना तयार करत येत्या ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करावा असे आदेश दिले आहेत. त्यासोबत अंतर्गत मूल्यांकन पद्धतीसंदर्भात १० दिवसांत निर्णय घ्यावा असेही सर्वोच्च नमूद केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाला अंतर्गत मूल्यांकन पद्धत ठरवण्यासाठी १४ दिवसांची मुदत दिली आहे.

देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आला. यात १२ वीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात घोषणा केली. मात्र या निर्णयावर अनेक संमिक्ष प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेक पालक आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा घेण्यात याव्या यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. पण कोरोना संसर्ग पाहता न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

परीक्षा रद्द केल्याने पुढील वर्गातील प्रवेश कोणत्या निकषांवर होणार असे प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित करण्यात आला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाला अंतर्गत मू्ल्यांकन पद्धतीने निकाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता सर्व राज्य शिक्षण मंडळांनाही अशाचप्रकारचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, आयसीएसई आणि सीबीएसई शिक्षण मंडळाने सादर केलेल्या मूल्यांकन पद्धतीचे निकषांना न्यायालयाने परवानगी दिली आहे. हे निकष योग्य असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button