एंजल ब्रोकिंगची विक्रमी कामगिरी; मार्चमध्ये ३,७९,२३३ ग्राहकांची नोंदणी
मुंबई : एंजल ब्रोकिंग लिमिटेडने डिजिटल कौशल्याच्या बळावर मासिक ग्राहक संपादनात विक्रमी कामगिरीची नोंद करत मार्च २०२१ मध्ये ३,७९,२३३ नवे ग्राहक जोडले आहेत. एंजल ब्रोकिंगचा ग्राहकवर्ग मार्च २०२१ पर्यंत ४.१ दशलक्षांपर्यंत पोहोचला आहे. एंजल ब्रोकिंगच्या एकूण ग्राहकांमध्ये वित्तवर्ष २०२१ च्या चौथ्या तिमाहीत ०.९६ दशलक्षांची वाढ झाली. वित्तवर्ष २०२० मधील पहिल्या तिमाहीतील संख्येपेक्षा ती १४.१ पटींनी जास्त आहे. एंजल ब्रोकिंगचा अॅव्हरेज डेली टर्न ओव्हर वित्तवर्ष २०२१ मधील चौथ्या तिमाहीत ३.७५ दशलक्षांवरून १५ पटींनी वाढली. तसेच एकूण व्यवहार वित्त वर्ष २०२०च्या पहिल्या तिमाहीतील ५४ दशलक्षांवरून वित्तवर्ष २०२१ च्या चौथ्या तिमाहीत मध्ये २१८ दशलक्षांपर्यंत पोहोचले.
एंजल ब्रोकिंगचे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी म्हणाले, “आज एंजल ब्रोकिंग डिजिटल फर्स्ट दृष्टीकोनाच्या आधारे, या क्षेत्रात नवा बेंचमार्क प्रस्थापित करण्याच्या मोहिमेवर आहे. स्टॉक मार्केटच्या समूहात टीअर २ आणि टीअर ३ शहरांतील जास्तीत जास्त मिलेनिअल्स सहभागी होऊन त्यांचा महसूलाचा प्रवाह वाढवू इच्छित आहेत. त्यांच्या ऑनबोर्डिंगपासून ते व्यापार तसेच प्रशिक्षणापर्यंतच्या सेवा शक्य तेवढी अखंड सुरु राहण्याची खात्री आम्ही देतो.”
एंजल ब्रोकिंगचे सीईओ विनय अग्रवाल म्हणाले, “गेल्या काही वर्षात आमच्या प्रत्येक एंजलाइटने केलेल्या मेहनतीचे फळ म्हणजे आम्ही साधलेला हा विक्रम. आमचे डिजिटल परिवर्तन धोरण अगदी पहिल्या दिवसापासून ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले आहे. तेव्हापासून आमच्या सुविधांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. आमची मार्केटिंगमधील मेहनत आणि आमच्या ग्राहकांनी केलेल्या तोंडी प्रसिद्धीतून हे शिखर गाठले गेले आहे. ही उंची गाठण्यासाठी आमची साथ दिल्याबद्दल मी सर्व भागधाराकांचे आभार मानतो. येत्या काळात भारतातील ब्रोकिंग क्षेत्राचा चेहरा आम्ही बदलू असा मला विश्वास आहे.”