‘इंडियास्किल्स २०२१ नॅशनल’चा दिल्लीत प्रारंभ

नवी दिल्ली : कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालायाच्या (एमएसडीई) मार्गदर्शनांतर्गत कार्य करणारी कौशल्य व उद्योजकता विकासासाठी शिखर संस्था राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाद्वारे (एनएसडीसी) आयोजित केली जाणारी राष्ट्रीय स्पर्धा इंडियास्किल्स २०२२ तालकटोरा इनडोअर स्टेडियम, नवी दिल्ली येथे सुरू झाली. या क्लोज्ड-डोअर इव्हेण्टमध्ये २६ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील सहभागी कार पेन्टिंग, पॅटिसरी व कन्फेक्शनरी, वेल्डिंग, अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चुरिंग, सायबर सुरक्षितता, फ्लोरिस्ट्री अशा ५० हून अधिक कौशल्यांमध्ये स्पर्धा करताना दिसण्यात येतील. महाराष्ट्रातून ७५ उमेदवार फायनल्समध्ये त्यांची कौशल्ये दाखवतील.
स्थानिक प्राधिकरण व राज्य सरकारने जारी केलेल्या कोविड-१९ नियमांचे पालन करत ७ ते ९ जानेवारी या कालावधीत प्रगती मैदानासह अनेक ठिकाणी या स्पर्धा आयोजित केल्या जातील. याशिवाय, अभ्यागत/प्रेक्षकांना प्रवेश न देणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि स्पर्धेच्या परिसरांचे वारंवार सॅनिटायझेशन यासह सर्व सुरक्षितताविषयक प्रोटोकॉल्सचे पालन केले जात आहे. सहभागींची अधिक विभागणी करण्यासाठी आठ कौशल्यांसाठी स्पर्धा ३ ते ५ जानेवारी या कालावधीत बेंगळुरू व मुंबई येथे घेण्यात आल्या. सर्व कौशल्य स्पर्धेतील विजेत्यांना १० जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे गौरविण्यात येईल.
कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल म्हणाले, ‘इंडियास्किल्स कॉम्पीटिशन तरूणांना त्यांची आवड जोपासण्यासाठी साधन देत त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व आशा निर्माण करते. ही स्पर्धा जगाला भारताची क्षमता दाखवून देते आणि सर्वसमावेशक तंत्रज्ञानांचे अध्ययन देण्यासोबत जागतिक व्यासपीठाची ओळख करून देते. यंदाच्या इंडियास्किल्समध्ये सात आधुनिक कौशल्यांच्या सादरीकरणामधून २१व्या शतकामध्ये उदयास येणा-या तंत्रज्ञानांसोबत गती कायम राखण्याबाबत आमचे प्रयत्न दिसून येतात. सर्व सहभागी उमेदवारांना माझ्याकडून शुभेच्छा आणि नॅशनल्समध्ये प्रवेश मिळवल्याबद्दल अभिनंदन. या तरूणांची अथक मेहनत व निश्चय पाहणे माझ्यासाठी सन्माननीय आहे. यामुळे माननीय पंतप्रधानांच्या ‘भारताला जगाची कौशल्य राजधानी’ बनवण्याचा दृष्टिकोन अधिक दृढ होईल. मी या स्पर्धेमध्ये बहुमूल्य योगदान देण्यासाठी एनएसडीसी, सेक्टर स्किल कौन्सिल्स, सहयोगी संस्था आणि सर्व भागधारकांचे देखील आभार मानतो.
एनएसडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेद मणी तिवारी म्हणाले, इंडियास्किल्स कॉम्पीटिशनचा प्रतिभावान व कुशल कर्मचा-यांचा समूह निर्माण करण्याचा मनसुबा आहे, जे भविष्यात देशाच्या आर्थिक विकासाला चालना देतील. ही स्पर्धा तरूणांना राष्ट्रीय व्यासपीठ देण्यासोबत जागतिक प्रशिक्षण मानक देते. ही स्पर्धा कौशल्यांची क्षमता शोधण्यासोबत तरूणांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण महत्त्वाकांक्षा बनवण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले पाऊल आहे. इंडियास्किल्सच्या यशामध्ये ज्युरी, तज्ञ, प्रशिक्षक, सेक्टर स्किल कौन्सिल्स, सहयोगी संस्था आणि देशाची सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा राबवण्यामध्ये एनएसडीसीला साह्य करणा-या राज्यांच्या सहयोगात्मक प्रयत्नांचा समावेश आहे.
कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकारचे सचिव राजेश अग्रवाल, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकारचे अतिरिक्त सचिव श्री. अतुल कुमार तिवारी, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यान्वित मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वेद मणी तिवारी, ओडिशा कौशल्य विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व माइण्डट्रीचे सह-संस्थापक श्री. सुब्रोतो बागची आणि राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. निर्मलजीत सिंग कलसी यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
इंडियास्किल्स २०२१ नॅशनल कॉम्पीटिशनची वैशिष्ट्ये
अ. अॅबिलिम्पिक्स – विकलांग व्यक्तींकडून कौशल्य प्रात्यक्षिक
इंडियास्किल्स २०२१ नॅशनल कॉम्पीटिशनमध्ये अॅबिलिम्पिक्सचा देखील समावेश असेल, ज्याअंतर्गत कम्प्युटर प्रोग्रामिंग, पेन्टिंग, भरतकाम व पोस्टर डिझाइनिंग अशा १६ कौशल्यांमध्ये विकलांग व्यक्तींच्या (पीडब्ल्यूडी) कौशल्यांचे प्रात्यक्षिक पाहायला मिळेल. अशा सहभागासह इंडियास्किल्समध्ये तळागाळापर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे आणि ही स्पर्धा कुशल कर्मचारीवर्गाच्या मागणी व पुरवठ्यामधील पोकळी भरून काढण्याच्या दिशेने प्रमुख पाऊल आहे.
ब. प्रात्यक्षिक कौशल्ये
इंडियास्किल्स २०२१ तीन नवीन कौशल्ये सादर करत आहे – योगा, शू मेकिंग (लेदर) आणि गारमेंट मेकिंग (लेदर), जे या व्यवसायांमधील उमेदरवारांना संधी देण्यासाठी प्रदर्शित केले जातील.
क. आधुनिक कौशल्ये
उदयास येणारे तंत्रज्ञान पाहता यंदाच्या स्पर्धेमध्ये सात आधुनिक कौशल्ये – रोबोट सिस्टिम्स इंटीग्रेशन, अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चुरिंग, डिजिटल कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्री ४.०, रिन्यूएबल एनर्जी, मोबाइल अॅप्लीकेशन्स डेव्हलपमेंट आणि इंडस्ट्रीयल डिझाइन टेक्नोलॉजी सादर करण्यात आले आहेत.
ड. उद्योगाला साह्य करणारे इंडियास्किल्स
इव्हेण्टला वर्कशॉप्स, बूटकॅम्प्सदरम्यान, तसेच स्पर्धांदरम्यान उमेदवारांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी पायाभूत सुविधा, तज्ञ व उपकरणांचे साह्य करणा-या उद्योगक्षेत्राकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
सहयोगी संस्था आहेत- मारूती सुझुकी, लार्सेन अॅण्ड टूर्बो, फेस्टो इंडिया, हॉटेल लीला, टोयोटा इंडिया, सीबीआयपी, कन्सेप्ट महिंद्रा, अकॅडमी ऑफ पेस्ट्री अॅण्ड कलनरी आर्ट्स, गव्हर्नमेंट टूल रूम अॅण्ड ट्रेनिंग सेंटर (जीटीटीसी), कर्नाटक जर्मन टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स (केजीटीटीआय) व इंडियन मशिन टूल मॅन्युफॅक्चुरर्स असोसिएशन (आयएमटीएमए), बेंगळुरू, आयसीटी सेंटर ऑफ एक्सलन्स, मुंबई, इंडियाटीव्ही न्यूज, प्लेटोनिया.
इ. इंडियास्किल्सकडून वर्ल्ड स्किल्सपर्यंतचा प्रवास
इंडियास्किल्स २०२१ नॅशनल कॉम्पीटिशन चार प्रादेशिक स्पर्धांनंतर आयोजित केली जात आहे. या प्रादेशिक स्पर्धा ऑक्टोबर-डिसेंबरदरम्यान पूर्व (पटणा), पश्चिम (गांधीनगर), उत्तर (चंदिगड) आणि दक्षिण (विशाखापटणम) येथे आयोजित करण्यात आल्या. ऑगस्ट व सब्टेंबर २०२१ दरम्यान जिल्हा व राज्य स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांच्या माध्यमातून प्रादेशिक स्पर्धांसाठी सहभागींची निवड करण्यात आली, जेथे २५०,००० हून अधिक उमेदवारांची नोंदणी झाली.
इंडियास्किल्स नॅशनल कॉम्पीटिशनच्या विजेत्यांना ऑक्टोबर २०२२ मध्ये वर्ल्डस्किल्स शांघाय, चीन येथे भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल.
इंडियास्किल्स नॅशनल्सच्या विजेत्यांना प्रकल्प-आधारित प्रशिक्षण, उद्योग व कॉर्पारेट प्रशिक्षण, उद्योगक्षेत्रांना प्रत्यक्ष भेटी, विचारशील कोचिंग आणि व्यक्तिमत्त्व विकास अशा बूट कॅम्प्स व उपक्रमांच्या माध्यमातून बहुस्तरीय उद्योग प्रशिक्षण मिळेल. एनएसडीसी त्यांचे सेक्टर स्किल कौन्सिल्स (एसएससी) आणि सहयोगी संस्थांच्या माध्यमातून उमेदवारांना स्पर्धांसाठी, तसेच भावी प्रयत्नांसाठी प्रशिक्षित करते.