भाई जगतापांचा एकेरी उल्लेख करत अमृता फडणवीसांचा इशारा
'ए भाई, तू असशील कोण, माझ्यावर बोट उचलायचं न्हाय'
मुंबई : पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत (Axis Bank) वळवण्याच्या प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्यावर चांगल्याचं भडकल्याचे पाहण्यास मिळाले. अमृता यांनी थेट आरे तुरेची भाषा वापरून जोरदार टीका केली.
अमृता फडणवीस या ना त्या मुद्यावरून ठाकरे सरकारवर टीकेची एकही संधी सोडत नाही. पण, काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष भाई जगताप यांच्या टीकेमुळे अमृता फडणवीस यांचा पार चांगलाच चढला. ‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय’ अशा शब्दांतच अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांच्यावर जोरदार पलटवार केला. तसंच, ‘पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही ‘UTI बँक / Axis बँक‘ ला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवचायचे न्हाय’ असा इशाराच अमृता यांनी भाई जगताप यांना दिला.
फडणवीस सरकारच्या काळात अमृता फडणवीस असलेल्या अॅक्सिस बँकेत पोलिसांची खाती वळवण्यात आली होती. ती कोणत्या आधारावर देण्यात आली होती, मग त्यावेळी फडणवीस यांनी राजीनामा दिला होता का? असा सवाल जगताप यांनी केली होता. तसंच, फडणवीस सरकारच्या काळात 25 प्रकरण बाहेर काढली होती. पण फडणवीस यांनी सर्वांची पाठराखण करून क्लीन चिट दिली होती, असा आरोपही जगताप यांनी केला होता.