मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर सुरू असलेल्या कारवाईविरोधात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रणशिंग फुंकले असून, भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. याला आता भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे.
आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है !#Maharashtra
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 15, 2022
संजय राऊत यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर अवघ्या काही वेळातच अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत या सगळ्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. “आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है!”, असे केवळ एका ओळीचे ट्विट करत अमृता फडणवीस यांनी केले आहे.