Uncategorized

मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्कॉर्पिओ प्रकरणातील तपास अधिकारी बदलला

मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीच्या अँटेलिया बंगल्याजवळ संशयित स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती. मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्याच्या गुन्ह्याचा तपास अधिकारी बदलण्यात आला आहे. क्राईम ब्रँचच्या सीआययु युनिटचे एपीआय सचिन वाझे यांच्या ऐवजी तपास सहायक पोलीस आयुक्त नितीन अल्कनुरे यांच्याकडे सोपवण्यात आला असल्याची माहिती आहे.

मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी 25 फेब्रुवारीला सापडली होती. 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 1 वाजता अंबानी यांच्या घराजवळ ही कार ठेवण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ही कार पोलिसांच्या निदर्शास आली होती. ही घटना उघडकीस येताच या घटनेचा तपास क्राईम ब्रांचच्या सीआययु युनिट कडे देण्यात आला होता. या युनिटचे प्रमुख ए पी आय सचिन वाझे हे आहेत. वाझे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ या घटनेचा तपास सुरू केला होता. मात्र, तपासात प्रगती नसल्यानं तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत. 25 ते 28 फेब्रुवारी या काळात सी आय युचं पथक तपास करत होतं. मात्र,आता या गुन्ह्याचा तपास अधिकारी बदलण्यात आला आहे.

सचिन वाझे यांच्या ऐवजी हा तपास आता सहायक पोलीस आयुक्त नितीन अल्कनुरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. 25 फेब्रुवारी रोजी घटना उघडकीस आली आहे. घटना घडून आता एक आठवडा होत आहे मात्र, तपासात काहीच प्रगती नाही. यामुळे आता हा तपास सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला असल्याचं म्हटलं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button