एगनेक्स्ट आणि नाफेडचा महाराष्ट्रातील शेतक-यांसाठी उपक्रम

मुंबई : एगनेक्स्ट टेक्नॉलॉजीज या भारतातील आघाडीच्या कृषी तंत्रज्ञान कंपनीने नाफेड (NAFED) सोबत भागीदारी करून महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या एफपीओसाठी (शेतकरी उत्पादक संघटना) डाळीच्या दर्जाच्या मूल्यमापनासाठी व्हर्चुअल प्रशिक्षण आणि जागरूकता उपक्रमाचे आयोजन केले होते. एगनेक्स्टने पाच एफपीओसोबत भागीदारी केली – व्हीसीएमएफ, मार्कफेड, महाएफपीसी, पृथाशक्ती आणि वापीको- जेणेकरून आगामी खरेदीच्या कालावधीत डाळींच्या आणि विशेषतः तूरडाळीच्या दर्जाबाबत जागरूकता निर्माण होऊ शकेल. या सत्रात एफपीओमधील प्रमुख लोक सहभागी होते. ते महाराष्ट्रातील जवळपास ४०,०००-५०,००० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊ शकतील.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट तूरडाळीसाठी बाजारातील विविध दर्जा निकषांबाबत एफपीओंना प्रशिक्षित करायचे होते. या मूल्यमापनाच्या आधारे या उत्पादनाला दर्जा दिला जाऊन बाजारात त्याची किंमत निश्चित होते. प्रत्यक्ष मूल्यमापन निकषांचे प्रत्यक्षात प्रदर्शन करण्यात आले, जेणेकरून सहभागींना तुकडा झालेली, खराब झालेली, कच्ची, आकाराने लहान झालेली किंवा तणाने ग्रस्त डाळ ओळखणे, त्यातील नकोसे घटक ओळखणे, नमुन्यांमधील आर्द्रता तपासणे आणि इतर अत्यावश्यक निकषांचा समावेश आहे. सहभागींना एगनेक्स्टचे प्रत्यक्ष दर्जा मूल्यमापन उपकरण ‘स्पेसएक्स व्हिसिओ’ कशा प्रकारे तूरडाळीचे नमुने तात्काळ ओळखू शकते आणि एका मिनिटापेक्षा कमी वेळेत प्रत्यक्ष दर्जा तपासू शकते हेही दाखवण्यात आले.
एगनेक्स्ट टेक्नॉलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक श्री. तरणजीत सिंग भामरा म्हणाले की, “अन्न दर्जा तपासणीच्या पारंपरिक पद्धतींमध्ये मानवी चुका होण्याची शक्यता असते. अंतिमतः याचा प्रभाव व्यापाराच्या वेळी उत्पादनाच्या किंमतीवर पडू शकतो. उत्पादनाच्या दर्जाच्या निकषांबाबत जागरूकता व समज असण्याने शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे व्यापार करणे आणि अधिक उत्पन्न मिळवणे शक्य होईल. त्याचवेळी शेतकऱ्यांच्या दारात आणि बाजारात तंत्रज्ञानावर आधारित सर्वोत्तम पद्धतींमुळे शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाचा दर्जा आणि उत्पादकता पुढील कालावधीत सुधारणे शक्य होईल. कृषी उद्योजक, उत्पादक संस्था आणि शेतकरी यांच्यामध्ये नियमित प्रशिक्षण आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीची सत्रे आयोजित करणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषी पर्यावरणात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानांचा वाढीव अंगीकार होऊ शकेल.”
महाराष्ट्रातील एक आघाडीची एफपीओ असलेल्या विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे (व्हीसीएमएफ) प्रादेशिक व्यवस्थापक श्री. संजय निचल म्हणाले की, “अन्नाच्या दर्जातील अनिश्चितता व्यापाराच्या वेळी कोणतेही उत्पादन नाकारणे किंवा त्याच्या कमी किंमतीच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. उदाहरणार्थ, कमी दर्जाच्या तूरडाळीला बाजारात कमी दर मिळतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. खरेदी संघटनांकडून वापरल्या जाणाऱ्या दर्जांचे निकष आणि नवीन युगाच्या तंत्रज्ञानाबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे. याचा फायदा शेतकरी उत्पादक संस्था आणि लघु भूमी धारक शेतकऱ्यांना उद्योगातील सर्वोत्तम पद्धतींबाबत अद्ययावत राहण्यासाठी होईल.”