Top Newsराजकारण

पंडित नेहरुंनंतर अलटबिहारी वाजपेयी देशातील लोकप्रिय नेते: संजय राऊत

मुंबई : अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आज देशभर साजरी होत असून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांकडून अटलबिहारी वाजपेयींना आदरांजली वाहण्यात येत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही अटलबिहारी यांच्या आठवणी जागवताना पंडित नेहरुंनंतर अटलबिहारी वाजपेयी हेच देशातील सर्वात लोकप्रिय नेते होते, असे संजय राऊत यांनी म्हटलं.

हिंदुत्वाच्या विचारधारेशी कधीही तडजोड न करता देशातील एकात्मता टिकली पाहिजे यासाठीच त्यांनी राजकारण केलं. धर्मांधता, जात्यंधता या दोन शब्दांना दूर ठेवूनही हिंदुत्वाचं राजकारण करता येतं, हे त्यांनी देशाला व जगाला दाखवून दिलं. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं अतिशय जवळचं नातं होतं. देशाचे प्रतप्रधान म्हणून ते बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा करत होते, त्यांच्याशी सल्लामसलत करत होते. शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीत अटलबिहारी वाजयेपी यांचं मोठं योगदान होतं, असे राऊत यांनी म्हटलं. तसेच, कारगिल युद्धात त्यांनी घेतलेल्या भूमिकेचीही आठवण संजय राऊत यांनी सांगितली.

पंडित नेहरुंच्या काळापासून ते संसदेत कार्यरत होते. पंडित नेहरु हे काँग्रेसचे प्रमुख नेते होते, देशाचे पंतप्रधान होते. तेव्हापासून अटलबिहारी यांचा राजकीय कार्यकाळ आहे. ते युवा खासदार असतानाही पंडित नेहरु त्यांचा सन्मान करत. अटलबिहारी हे संपूर्ण देशाचे नेते होते, ते कुठल्याही एका पक्षाचे किंवा विचारधारेचे नेते नव्हते. त्यामुळेच, पंडित नेहरुंनंतर देशाचे नेते असलेले ते एकमेव नेते होते, असे मी मानतो, असेही राऊत यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांची आदरांजली

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या समधीस्थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदरांजली वाहिली. त्यांनी ‘सदैव अटल’ या समाधीस्थळावर पुष्पांजली वाहिली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याह राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, निर्मला सितारमण आणि हरदीप सिंह पुरी यांनीही अटल बिहारी वाजपेयी यांना पुष्पांजली अर्पण केली.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून म्हटले की, आदरणीय अटलजींना कोटी कोटी प्रणाम. आज जयंतीदिनी अटलजींची आठवण येतेय. त्यांची समृद्ध सेवा संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. भारताला मजबूत बनण्यासाठी तसेच देशाच्या विकासासाठी त्यांनी सदैव प्रयत्न केले. त्यांच्या विकासकामांचा भारतीयांवर सकारात्मक प्रभाव आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर म्हटले, मी अटलजींना त्यांच्या जयंतीनिमित्त नमन करतो. ते एक महान देशभक्त असून एक प्रख्यात वक्ते, अद्भूत कमी, सक्षम प्रशासक आणि एक उल्लेखनीय सुधारणावादीच्या रुपात स्वतःची ओळख निर्माण केली. अटलजींचे अमूल्य योगदान विसरणे शक्य नाही. त्यांना सादर प्रणाम.

गृहमंत्री अमित शाह यांनीही ट्विट केले. ते म्हणाले, अटलजींनी कठोर तत्त्व आणि अद्भुत कर्तव्यनिष्ठेने देशात अंत्योदय आणि सुशासनाची कल्पना राबवून भारतीय राजकारणाला नवी दिला दिली. अटलजींनी त्यांच्या कार्यकाळात अनेक दूरदर्शी निर्णय घेऊन भारताचा पाया मजबूत केला. मोदी सरकार दरवर्षी अटलजींच्या योगदानाचे स्मरण करत उत्साहान सुशासन दिन साजरा करते. सर्वांना सुशासन दिनाच्या शुभेच्छा!

राजकारणातील आदर्श युगपुरुष : नड्डा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले, भारतीय राजकारणातील आदर्श युग पुरुष कोट्यवमधी भाजप कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक तसेच माजी पंतप्रधान, भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम. देश तसेच संघटनाच्या सेवेसाठी समर्पित, युगदृष्टे अटलजी यांचे जीवन आम्हा सर्वांसाठी एक प्रेरणास्रोत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारतीय जनता पार्टीला यशशिखरावर पोहोचवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका पार पाडली. नव्वदीच्या दशकात ते पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून पुढे आले. केंद्रात प्रथमच भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले. पंतप्रधान पदावरील कार्यकाळात वाजपेयी यांनी देशात उदारीकरणाला प्रोत्साहन दिले. यामुळे पायाभूत सुविधा आणि विकासाला गती मिळाली.

नितीन गडकरी म्हणाले, सुशासन अटलजींचं स्वप्न, ते आपल्याला पूर्ण करायचंय

माजी पंतप्रधान अटल विहारी वाजपेयी यांचं देशात सुशासन प्रस्थापित करण्याचं स्वप्न होतं. ते आपल्याला पूर्ण करायचं, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केलं. सुशासन दिनानिमित्त कार्यक्रमात ते नागपुरात बोलत होते.

गडकरी म्हणाले, अनेक कार्यकर्त्यांना अटलजींचा सहवास मिळाला. आता त्यापैकी काही कार्यकर्ते आपल्यामध्ये नाहीत. महाराष्ट्रात अटलजींचा दौरा झाला होता तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. अटलजींना मराठी नाटक खूप आवडायचं. हिंदी साहित्यावर त्यांचं अतूट प्रेम होतं. अविस्मरणीय व्यक्तिमत्वाची आजही आठवण केली जात आहे. अटलजी घरी आलेल्या प्रत्येकाला भेटत असत.

नितीन गडकरी यांनी अटल विहारी वाजपेयींबद्दल सांगितले की, संघ आणि भाजपबद्दल त्यांच प्रेम होतं. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचविणे हे त्यांचं ध्येय होतं. कारगिलला टनल बनविलं तेव्हा मला अटलजींची आठवण झाली. कारण त्याच जागेवर पाकिस्तानने कब्जा केला होता. कारगिल युद्ध आपण जिंकलो त्या टनलला अटलजींचं नाव देण्यात आलं. अटलजींच्या जयंती निमित्ताने सुशासन दिन आपण पाळतो. सुशासन हे अटलजींच स्वप्न होतं. ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. अटलजींच्या व्यक्तिमत्त्वाचा परिणाम अनेकांच्या जीवनावर झाला. तसाच तो माझ्याही जीवनावर झाल्याचं गडकरींनी यावेळी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button