अनिल देशमुख व परमबीर सिंग यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाच्या चौकशीकामी अॅड. शिशिर हिरे यांची नियुक्ती
मुंबई : माजी गृह मंत्री अनिल देशमुख व मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यातील आरोप प्रत्यारोप ज्याचा प्रत्यक्ष संबंध सचिन वाजे, मनसुख हिरण प्रकरणाशी आहे. त्याबाबत चौकशीसाठी नेमण्यात आलेले उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती के.यु.चांदीवाल, उच्चधिकार समितीचे वकील म्हणून मालेगावचे अॅड. शिशिर हिरे यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाने न्यायमूर्तीच्या आदेशानुसार केली आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या अंटेलिया या प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकाच्या प्रकरणापासून सुरू झालेल्या प्रकरणात अनेक घडामोडी घडत गेल्या. त्यात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आर्थिक मागणीचे खंडणीचे आरोप केलेत. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती के. यु. चांदीवाल उच्चधिकार समिती गठीत केली आहे. त्याकामी महाराष्ट्र शासनाने विशेष सरकारी वकील अॅड.शिशिर हिरे यांची चौकशी समितीचे वकील म्हणून नियुक्ती महाराष्ट्र शासनाने न्यायमूर्तीच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
सदर घटनेचा प्रत्यक्ष संबध सचिन वाजे – मनसुख हिरण प्रकरणाशी असून सोमवारी संध्याकाळी शासनाने सदर चौकशी समितीचा अधिकारी वर्ग व समितीच्या वकिलांची घोषणा केली. त्यात अॅड. हिरे यांना समितीचे वकील म्हणून नेमण्यात आले आहे. या आधी ३ एप्रिल रोजी समितीस चौकशी आयोग कायदा १९५२ यानुसार उपलब्ध असणारे अधिकार प्रदान करण्यात आले असून सदर उच्चाधिकार समिती त्या अंतर्गत असलेले सर्व अधिकार वापरू शकते. सदर समितीस ६ महिन्यात स्वतःचा अहवाल सादर करावयाचा असून समितीचे कामकाज मुंबई येथे चालणार आहे. अॅड.शिशिर हिरे यांची यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली असून सदर खटल्यात अॅड. हिरे हे कामकाज करीत आहे.