Uncategorizedराजकारण

महाराष्ट्रात ठाकरे सरकारकडून ‘ऑपरेशन लूट’

वसुली कोणासाठी सुरु होती; केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज पत्रकार परिषद घेत परमबीर सिंह यांच्या चिठ्ठी प्रकरणावर भाष्य करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी सचिन वाझे कोणाच्या दबावाखाली होते. शिवसेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की मग शरद पवार असा सवाल करत गृहमंत्री कोणासाठी वसुली करत होते स्वत:साठी की सरकारसाठी असा सवाल करत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. हा भष्ट्राचार नाही तर हे ‘ऑपरेशन लूट’ आहे. सरकारी यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत जनतेच्या पैशांची लूट सुरु आहे. असाही घाणाघात त्यांनी आघाडी सरकारवर केला.

या पत्रकार परिषदेत बोलताना रवीशंकर म्हणाले की, गृहमंत्र्यांवर जे आरोप लावले आहेत ते गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. ही वसुली ते स्वत:साठी करत होते की पक्ष राष्ट्रवादीसाठी करत होते? की सत्तेतील सरकारसाठी करते होते? हे खूप गंभीर सवाल आहेत. १०० कोटी दरमहिना वसूल करण्याचे आदेश दिले, आणि वसुलीसाठी या अधिकाऱ्यांना १७ हजार रेस्टॉरंट बार यांना एकत्र करत यांच्याकडून २, ३ लाख मागितल्यानंतर ४० ते ५० कोटी जमा होतीलच असे सांगितले जायचे. देशमुख हे सर्व आपल्यासाठी करत होते की पक्षासाठी? यावर शरद पवार यांना उत्तर द्यावे लागेल. तसेच उद्धव ठाकरे यांनाही उत्तर द्यावे लागेल. हा छोटा विषय नाही, हे भष्ट्राचाराचे अतिशय गंभीर प्रकरण आहे. असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर टीका केली.

मी मीडियाच्या लोकांना विनंती करतो की, या विषयाची गंभीरता लक्षात घ्या. यावरून आणखी एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. वसुलीचे मुंबईसाठी १०० कोटी टार्गेट होते. यावर उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी सांगावे की पूर्ण महाराष्ट्रासाठी टार्गेट किती होते? जर एका मंत्र्याचे एवढे टार्गेट होते तर इतर मंत्र्यासाठी किती टार्गेट होते?

यावेळी रविशंकर प्रसाद यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हणाले की, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहात ना, ज्यांनी जय महाराष्ट्र हा शब्द दिला होता. परंतु तुम्ही सत्तेसाठी धोकेबाज सरकार स्थापन केले. यामुळे तुम्ही तुमच्याच वडीलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवत आहात. जय महाराष्ट्र जिथे आपण मुख्यमंत्री आहात. तिथे कोटींची लूट होत आहे. यामुळे उध्दव ठाकरे सरकार सत्तेवर राहण्याचे अधिकार गमावून बसले आहे.

हे सरकार महाविकास आघाडी सरकार नाही तर लूट करणारे महाविकास आघाडी सरकार आहे. कमाल सरकार आहे. बिहारमध्ये चारा घोटाळा, कोळसा घोटाळाचे मॉडेल होती, मात्र हे मॉडेल कमाल आहे. मीडियाने हे प्रकरण गांभिर्याने घेतले पाहिजे, देशातील अनेक भष्ट्राचारांची प्रकरणे उजेडात आणण्यात माध्यमांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे आता भाजपही या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत ठाकरे सरकारविरोधात आवाज उठवत रस्त्यावर उतरणार आहे, असेही केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button