स्पोर्ट्स

अंबानींनंतर आता क्रिकेट विश्वात अदाणींची एन्ट्री !

मुंबई : भारतीय क्रिकेट बोर्डानं इंडियन प्रिमिअर लीगच्या दोन नवीन टीमच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्येक फ्रेंचाइजीपासून ७ हजार ते १० हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु बीसीसीआयनं लिलावाची बोली तांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर सोमवारी याची घोषणा करणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अशा २२ कंपन्या आहेत, ज्यांनी १० लाख रुपये भरून निविदा कागदपत्रे घेतले आहेत.

नव्या टीमचं आधार मूल्य २ हजार कोटी ठेवलं आहे. अशावेळी केवळ ५-६ जण गंभीर बोली लावण्याची शक्यता आहे. बीसीसीआय फ्रेंचाइजीसाठी बोली लावण्यासाठी तीन कंपन्या अथवा व्यक्ती यांना परवानगी देणार आहे. या लिलावात बोली लावणाऱ्या व्यक्ती अथवा कंपनीची वार्षिक उत्पन्न किमान ३ हजार कोटी असायला हवं. तसेच उलाधाल २५०० कोटी असायला हवी.

भारतात सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेले गौतम अदाणी आणि त्यांचा समूह अहमदाबाद फ्रेंचाइजीसाठी बोली लावण्याची शक्यता आहे. अदाणी समूह बोली लावणार असेल तर ते नव्या टीमचे फ्रेंजाइजी मालक बनतील. तसेच अब्जाधीश संजीव गोयंका हेदेखील नव्या फ्रेंजाइजीसाठी बोली लावण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु हे स्पष्ट नाही की, आरपीएसजी कॉन्सॉर्टियम भागीदारीत ही बोली लावणार का वैयक्तिक या लिलावात सहभागी होणार आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम अदाणी आणि संजीव गोयंका भारतीय उद्योग क्षेत्रातील महत्त्वपूर्ण नाव आहे. हे दोघं लिलावात सक्रीयतेने भाग घेणार आहे. कमीत कमी ३५०० कोटी रुपयांची संभाव्य बोली लागण्याची अपेक्षा आहे. आयपीएल प्रसारण अधिकारातून जवळपास ५ बिलियन डॉलर(३६ हजार कोटी) मिळण्याचा अंदाज असल्याचं सांगण्यात येत आहे. गोयंका दोन वर्ष पुणे फ्रेंचाइजी रायजिंग पुणे सुपरजायंट्सचे मालक होते. आयपीएल लिलावात कोटक समुह, फार्मास्युटिकलचे प्रमुख अरबिंदो फार्मा आणि टोरेंट समुहही सहभागी होऊ शकतं.

अहमदाबाद, लखनऊचा दावा

शहरांचा विषय असेल तर अहमदाबाद आणि लखनऊ यांचं पारडं जड आहे. अहमदाबादकडे मोटेराजवळ नरेंद्र मोदी स्टेडिअम १ लाखाहून अधिक क्षमता असलेले ग्राऊंड आहे. तर लखनऊमध्ये इकाना स्टेडिअमकडे ७० हजारांची क्षमता आहे. या स्पर्धेत इंदुर, गुवाहाटी, धर्मशाला आणि पुणेसारख्या शहरांचाही समावेश आहे. बॉलिवूड जोडी दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर हे दोघंही कॉन्सॉर्टियमचा भाग असल्याबाबत स्पष्टता नाही. परंतु नव्या फ्रेंजाइजीत ते अल्प भागीदार अथवा ब्रँड अम्बेसिडर असू शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button