राजकारण

पी. चिदंबरम यांना चप्पल फेकून मारणाऱ्या माजी आमदाराचे कोरोनाने निधन

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे नेते आणि राजौरी गार्डनचे माजी आमदार जरनेल सिंग यांचं शुक्रवारी सकाळी निधन झालं आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांना चप्पल फेकून मारल्यानं जरनेल सिंग चर्चेत आले होते. यानंतरच त्यांनी आम आदमी पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि त्यांनी विजयही मिळवला. याआधी जरनेल सिंग यांनी १९८४ मधील दंग्यांचा विरोध करुन आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जरनेल सिंग यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटलं, की दिल्लीचे माजी आमदार जरनेल सिंग यांच्या निधनामुळे अतिशय दुःख झालं. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानामुळे ते नेहमीच लक्षात राहातील. केजरीवाल सरकारमधील मंत्री मनीष सिसोदिया यांनीही जनरेल सिंग यांच्या निधनामुळे दुःख व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, की दिल्ली विधानसभेतील माजी साथीदार जरनेल सिंग यांच्या निधनाची बातमी आपल्या सर्वांसाठी दुःखद आहे. १९८४ मध्ये नरसंहारच्या पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारा एक बुलंद आवाज आपल्यातून निघून गेला आहे. देव त्यांना आपल्या चरणात जागा देवो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button