अमन, शांती, चयन असा तिहेरी नारा देत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिल्लीपासून लाहोरपर्यंत बससेवा सुरू करून शांतीचा संदेश दिला, पण दुर्दैवाने दुश्मन राष्ट्र पाकिस्तानने शांती प्रस्तावाला तिलांजली देत कारगिल युध्द हिंदुस्थानवर लादले. दीड महिन्याच्या युध्द काळात पाकिस्तानला चारीमुंड्या चितपट करून हिंदुस्थानने कारगिलच्या शिखरावर तिरंगा ध्वज दिमाखात फडकवला.या युध्दात आपले ३६४ जवान शहीद झाले ,पण या युध्दाच्या अगोदर आपल्या देशातील जो शासकिय भ्रष्टाचार आणि कामचुकारपणा चव्हाट्यावर आला त्याने देशवासीयांची मान शरमेने नक्कीच खाली गेली .
हिंदुस्थानचा पराभव चीन काय ॽ किंवा पाकिस्तान काय ॽ कधीच करू शकणार नाहीत तर आपणच आपला पराभव करू शकतो हे आता पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे . ज्यावेळी युध्दाचा बिगुल वाजला त्यावेळी सुट्टीवर असणाऱ्या सर्व लष्करी अधिकारी व जवानांना तातडीने कार्यरत राहण्याचे वाॅरंट बजावण्यात आले ,चंदीगड येथील कर्नल बाली हे तातडीने लष्करी पोशाखात रेल्वे स्टेशनवर गेले त्यांनी स्टेशन मास्तरला वाॅरंट दाखवून एका सिटची मागणी केली त्यावेळी संबंधित मास्तरने सिट देतो पण चहापाण्याची सोय करा असं कर्नलांना सुचविले तेंव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मास्तरांच्या कानाखाली खाडकन आवाज काढला इथून या सर्वव्यापी बरबटलेल्या भ्रष्टाचाराच्या कहाण्यांना सुरूवात होते .
चंदीगड येथे हे रामायण घडत असताना इकडे आपल्या महाराष्ट्रात भुसावळ रेल्वे स्टेशनवर महाभारत घडत होते , लान्स नायक बाबुसिंग हे देखील लष्करी सेवेत रुजू होण्यासाठी भुसावळ रेल्वे स्टेशनवर गेले त्यावेळी सहा पोलिस शिपायांनी बाबुसिंग यांच्याकडे असणाऱ्या ट्रंकला रेल्वेतून नेण्यासाठी पैशाची मागणी केली त्याचवेळी बाबुसिंग यांनी सहातील एका शिपायाची गचुंडी धरून त्याला जाब विचारला . परिणामी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पोलीसांनी भारतीय दंड कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला व बाबुसिंग यांना रात्रभर तुरुंगवास भोगावा लागला , दुसऱ्या दिवशी जामीनावर सुटका झाल्यावर बाबुसिंग वेळेअभावी सेवेत दाखल होऊ शकले नाहीत .त्यांनी
भुसावळच्या राहत्या घरीच विष पिऊन आत्महत्या केली ,कारण एकच लष्करी कायद्यात वेळेला आणि मिळालेल्या हुकुमाला फार महत्त्व असते .बाबुसिंग आपले वडील आजारी असल्याने सुट्टीवर आले होते , काही दिवसांत ते पुन्हा सेवेत रुजू होणार होते. मधल्या काळात युध्दाचा बिगुल वाजला म्हणून ते आई वडिलांना दवाखान्यात उपचारासाठी करून भुसावळच्या रेल्वे स्टेशनवर आले होते आणि हे सर्व महाभारत घडले.
लष्करी हुकुम आला की, you are do or die, never ask to why. अशा पध्दतीची लष्करी अंमलबजावणी असते.या आशयाचा उल्लेख अमेरिकेतील विश्वविख्यात कवी लाॅर्ग टेनिसनने त्यांच्या In to the Vaili death six hundred या पुस्तकात केला आहे , या पुस्तकात लष्करी अधिकाऱ्याने चुकीचा हुकुम बजावून सहाशे जवानांचा कशा पध्दतीने बळी घेतला याचा सविस्तर लेखाजोखा त्यांनी मांडला आला आहे .या सहाशे जवानांना त्यांना मिळालेला आदेश चुकीचा आहे हे पुर्णपणे माहीत असूनही आदेशाची अंमलबजावणी या जवानांनी केली , परिणामी सगळ्यांना आपला जीव गमवावा लागला ही आजपर्यंतच्या लष्करी इतिहासातील सर्वात मोठी आणि तितकीच मोठी चूक मानली जाते. तर लष्करी हुकुमाची अंमलबजावणी करण्यासाठी निघालेल्या ज्या लान्स नायक बाबुसिंग यांनी आत्महत्या केली त्याच बाबुसिंगानी पाकिस्तानला धुळ चारली असती . पण आपल्या भ्रष्ट आणि नालायक पोलीसांसमोर बाबुसिंग हतबल झाले म्हणूनच आपल्याला जितका शत्रू राष्ट्रांकडून धोका आहे, त्यापेक्षा अधिक धोका देशांतर्गत भ्रष्ट यंत्रणेकडून आहे असं म्हटल तर अजिबात वावगं ठरणार नाही..यात बांगलादेशी घुसखोर ,मानव हक्काचे दलाल आणि देशाच मीठ खाऊन चीन व पाकड्यांची आरती ओवाळण्यात मश्गूल असणारे सत्तेतील त्याचबरोबर सत्तेबाहेरचे देशद्रोही दलाल आदींचा समावेश आहे.
कारगिल युध्दाचा विचार करता कर्नल बाली यांच्या तुकडीने सिंध प्रांतात लष्करी कारवाईत पाच अतिरेक्यांना कंठस्नान घातले .या कारवाईत पाचवा अतिरेकी स्वतःला साधा रहिवासी म्हणजेच सिव्हिलीयन असल्याचे बाली यांना सांगत होता त्यावेळी या कथित रहिवाशाला जिवंत सोडण्याचा निर्णय बाली घेत असताना दुसऱ्या अधिकाऱ्यांने बाली यांचे डोळे उघडले त्यावेळी क्षणाधार्थ त्याचा खात्मा करण्याचा हुकुम बाली यांनी दिला. या अतिरेक्याच्या कपाळावर गोळी झाडली आणि त्याचे प्रेत पोटावर केले त्यावेळी या अतिरेक्याच्या पाठीत लोडेड एके ५६ गन मिळाली त्यामुळे कर्नल बाली यांची कामगिरी किती उल्लेखनीय आहे हे कळून येईल. तर अशा अधिकाऱ्यांकडून रेल्वे स्टेशन मास्तरला वरकमाई हवी होती ॽ
लष्करी अधिकारी व जवानांना खरं पाहता उच्चच नाहीतर सर्वोच्च दर्जाची वागणूक मिळायला हवी आणि आपण प्रत्येक नागरिकांनी ती देणं अत्यावश्यक आहे तरच आपण खरे देशप्रेमी आहोत याची मनोमन खात्री बाळगावी . लष्करी अधिकारी व जवानांनी देशाचे रक्षण करायचे आणि आपण आपल्या पध्दतीने देश ओरबाडून खायचा ,यात केवळ पैशाचा भ्रष्टाचार होतोय असं नाही तर इथं दैनंदिन कामात देखिल भ्रष्टाचार होतो आहे.
दीड महिना चाललेल्या कारगिल युध्दात ३६४ जवान शहीद झाले , पण अशाच युध्दासाठी निघालेल्या ४५० जवानांना युध्दभूमीवर जाण्यापूर्वी वीरमरण येते त्यावेळी सगळी यंत्रणा तकलादू वाटते.हिंदुस्थानच्या ईशान्य भागात दिल्लीहून आसामकडे निघालेल्या रेल्वेचा विरूद्ध दिशेने येणाऱ्या रेल्वेची समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेतील भिषण अपघातात ५५० प्रवाशांपैकी तब्बल ४५० जवान, एका दारुड्या लाईनमनच्या चूकीच्या सिग्नलची शिकार होऊन प्राणास मुक्तात तेंव्हा आपण हिंदूस्थानातच राहतो का ? असा यक्ष प्रश्न आ वासून उभा ठाकतो. दिल्ली ते आसाम अशी रेल्वे अप्पर ट्रॅकवरून जात होती या रेल्वेने आपला ट्रॅक सोडून ९० कि.मी.अगोदर डाऊन ट्रॅकला येणं आवश्यक होतं पण त्याठिकाणचा लाईनमन दारू पिऊन फुल्लटू झाला होता , परिणामी त्याने आसामकडे निघालेल्या रेल्वेला ट्रॅक बदलण्याचा सिग्नल देण्यासाठी जो खटका दाबायला पाहिजे होता तो दाबलाच नाही त्यामुळे ही रेल्वे तब्बल ९० कि.मी.अंतरापर्यंत डाऊन ट्रॅकला आलीच नाही, मग गायसला हा अपघात झाला आणि लष्करी बळाची फार मोठी हानी झाली .९० कि.मी.च्या मधल्या काळात तीन रेल्वे स्टेशन होती तिथलेही सिग्नलमन झोपा काढत होते का ॽ तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की युध्दात जेवढे जवान शहीद झाले नाहीत त्याच्या कितीतरी अधिक पटीने रेल्वे अपघातात जवान मरण पावतात. याचाच अर्थ आपला देश किती महान आहे याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे .