Top Newsराजकारण

धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या करुणा शर्माच्या गाडीत पिस्तुल !

परळी : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तूर्तास परळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून चौकशी चालू असल्याचे समजते आहे. परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार, पुरावे देणार हे दावे तूर्तास तरी फोल ठरले असून करुणा शर्माच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळल्याने त्यांच्या धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान परळी शहरातील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या असून शहर पोलीस ठाण्यासमोर दाखल झाल्या आहेत. या महिलांनी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी तर केलीच पण आज थेट धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी डाव आखला असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे. यावर आता परळी पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नेहमी धनंजय मुंडेंना उध्वस्त करणार, संपावणार यासारख्या भाषा करणाऱ्या करुणा शर्मा यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात तसेच फेसबुकवरील आपल्या खुलाशात देखील म्हटले होते. वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेणार, पत्रकार परिषद घेणार व त्यानंतर मुंडेंच्या घरी जाणार असे स्वतः करुणा यांनीच जाहीर केले होते. तेव्हा बेकायदेशीर रित्या बाळगलेले पिस्तुल घेऊन करुणा शर्मा मुंडेंच्या घरी कोणत्या उद्देशाने निघाल्या होत्या, या सवालाने परळीत एकच खळबळ उडाली आहे. परंतु करुणा शर्मा नामक या महिला परळीत पत्रकार परिषद घेऊन आपल्या व्यथा मांडायला व न्याय मागायला आल्या नव्हत्या हे मात्र आता स्वयंस्पष्ट आहे.

करुणा शर्मा यांना अटक

करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल सापडल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मला फसवायचा प्रयत्न करत आहेत. माझ्या गाडीत जबरदस्तीने रिव्हॉल्व्हर ठेवली, असा आरोप करुणा शर्मा यांनी केली. धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि दबाव टाकून माझ्या गाडीत रिव्हाल्वर टाकली आणि माझ्या वरील खोटे गुन्हे दाखल केले आहे. धनंजय मुंडे यांनी जोर जबरदस्ती बळाचा वापर केला आहे, असा आरोप करून शर्मा यांनी केला आहे.

करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा हिने सर्वात अगोदर मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तसंच ट्विट करत तक्रारीची कॉपीपोस्ट केली होती. यावेळी रेणू शर्मा यांनी गंभीर आरोप केले होते, यानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यामधील संबंध व प्रकरण समोर आले. याला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुष्टी दिली तसंच त्यांचे कधीपासून सहसंबंध आहेत. या संदर्भात देखील खुलासा केला. यात करुणा शर्मा यांच्यापासून धनंजय मुंडे यांना दोन आपत्य असल्याचे पहिल्यांदा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवरून जाहीर केले होते.

काही दिवसानंतर रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यावर हे प्रकरण तीन चार महिने शांत झाले. यावेळी धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्या सोबत घटस्फोट प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. कोर्टामध्ये केस सुरू असल्याचे फेसबुकवरील पोस्टमध्ये नमूद केले होते. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून करुणा शर्मा या संपत्ती पासून सामाजिक आणि राजकीय विषयावर ती कायम भाष्य करत होत्या. तसंच फेसबुक लाईव्ह करत होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुक लाईव्ह करत मी परळीमध्ये येणार आहे तसंच पत्रकार परिषद घेऊन सर्व काही सांगणार आहे, असं सांगितल्यानंतर बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button