आरोग्य

कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला ९ महिन्यानंतर लस देण्याची शिफारस

नवी दिल्ली : कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला कोरोनाची लस घेण्यासाठी ९ महिन्याचं अंतर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा सल्ला एका NIAGI अर्थात The National Technical Advisory Group on Immunisation ने दिला आहे. यापूर्वी NIAGI ने कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी ६ महिन्यानंतर कोरोनाची लस घ्यावी असं सांगण्यात आलं होतं. पण आता हे अंतर ९ महिन्यापर्यंत वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, या सल्ल्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची आवश्यकता आहे. त्यामुळे ही सूचना आता केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. हा सल्ला देण्यापूर्वी कोविशील्ड लसीच्या दुसऱ्या डोसबाबतही महत्वाची सूचना केली होती. कोविशील्ड लसीच्या दोन्ही डोस मधील अंतर १२ ते १६ आठवडे करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर सरकारकडून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यापूर्वी कोविशील्ड लसीचा दुसरा डोस ४ ते ८ आठवड्यानंतर म्हणजे साधारणपणे ४५ दिवसांनंतर दिला जात होता.

कोविशील्ड लसीबाबत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. ज्या नागरिकांनी कोविशील्डच्या दुसऱ्या डोससाठी यापूर्वीच नोंदणी केली होती, त्यांची नोंदणी कायम राहणार आहे. म्हणजे ते आधी मिळालेल्या तारखेलाच दुसरा डोस घेऊ शकणार आहेत. मात्र, आता नोंदणी करणाऱ्या नागरिकांना नव्या नियमानुसारच दुसऱ्या डोससाठी नोंदणी करावी लागणार आहे. कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर आधी ६ ते ८ आठवडे होतं. भारतात आता या लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून १२ ते १६ आठवडे करण्यात आलं आहे. कोविड वर्किंग ग्रुपने त्याबाबत शिफारस केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button