Top Newsराजकारण

भाजपच्या चिखलफेकीला उद्या शिवसेना भवनातून तोडीसतोड उत्तर; संजय राऊतांचा इशारा

मुंबई: उद्या शिवसेना भवनात शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे. मी या पत्रकार परिषदेत असतीलच पण शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या पत्रकार परिषदेत असतील. शिवसेना आणि ठाकरे परिवारांवर जो काही चिखल उडवला जात आहे त्याला आम्ही तोडीसतोड उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना नेते आणि खा. संजय राऊत यांनी दिला.

खा. संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. शिवसेना भवनात उद्या पत्रकार परिषद घेणार. शिवसेना हे महाराष्ट्राचे ऊर्जा केंद्र आहे. त्याच ठिकाणी बसून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्य आणि देशाला दिशा दिली. त्याच शिवसेना भवनात उद्या ४ वाजता पत्रकार परिषद होईल. मी असेलच. पण ही पत्रकार परिषद शिवसेनेची असेल. आमदार, खासदार आणि मंत्री असतील. संपूर्ण देश उद्या ऐकेल. काय होतंय हे उद्या पाहा. आम्ही खूप सहन केलंय आता बर्बादही करणार, असा इशारा त्यांनी दिला.

हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल असं भाजप नेते सांगत आहेत. अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जातील असंही वारंवार सांगितलं जात आहे. पण तुम्हाला सांगतो, भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्याच बाजूच्या कोठडीत जाणार आहेत. देशमुख बाहेर असतील आणि भाजपचे लोक आत असतील. आय रिपीट. आता बस्स झालं. राजकीय मर्यादांचं उल्लंघन तुम्ही केलं आहे. आता तुम्हाला कळेल काय असतं ते. हमाम में सब नंगे होते है, असं विधान राऊत यांनी केलं आहे. राऊत यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे. भाजपचे कोण नेते तुरुंगात जातील यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

जी काही दादागिरी चालली आहे त्याला आम्ही उत्तर देऊ. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेना, ठाकरे परिवारावर जो काही आरोपांचा चिखल उडवला जातोय त्याला आम्ही उत्तर देऊ. हा जेलमध्ये जाईल तो जेलमध्ये जाईल. देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत असेल असं काही सांगितलं जात आहे. पण आता देशमुख कोठडीबाहेर असतील आणि भाजपचे साडेतीन लोकं अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील, असं ते म्हणाले.

महाराष्ट्रातही सरकार आहे. हे लक्षात घ्या. ते शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. सरकार हे सरकार असतं. त्यामुळे ज्यांना आत टाकायचे आहे, त्याचा बंदोबस्त सुरू आहे. हमाम में सब नंगे होते है. एक मर्यादा असते राजकारणात. तुम्ही ती ओलांडली आहे. सर्वांना माहीत आहे मी काय बोलतोय आणि कुणाबद्दल बोलत आहे. माझ्या बोलण्यामुळे त्यांची झोप उडाली आहे. आम्हाला धमक्या देऊ नका. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. मी तर नाहीच नाही. एजन्सी आणि सरकारला जे उखडायचे ते उखडा, असा इशाराच त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button