इतर

कुख्यात गुंड गजा मारणे प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक

पुणे : माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. कुख्यात गुंड गजा मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत संजय काकडे यांच्या गाड्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी काकडेंना अटक केली आहे. शिवाजी नगर न्यायालयात हजर केल्यानंतर, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता अधिक माहिती देतील, असं सांगण्यात येत आहे.

गुंड गजानन मारणे याने तळोजा तुरुंगातून सुटल्यावर जंगी मिरवणूक काढली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर काढलेल्या या मिरवणुकीत शेकडो कार होत्या. या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या प्रकरणाची गुन्हे शाखेकडून चौकशी केली जात होती. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात काकडेंना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. बुधवारी सकाळी बंडगार्डन पोलिसांनी काकडे यांना अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button