इतर

कोरोनामुळे पोहरादेवी यात्रा रद्द

वाशिम : बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे दरवर्षी रामनवमीला निमित्त यात्रा भरते. याठिकाणी देशातील लाखो भाविक हजेरी लावतात.. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने जिल्हा प्रशासनाकडून हा यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दि. 18 ते 22 एप्रिल दरम्यान या परिसराच्या 5 किमी क्षेत्रात मानवी हालचालींना पूर्णतः प्रतिबंध करण्यात आला आहे. यासर्व नियोजनात गर्क असलेल्या खुद्द पोलीस प्रशासनाकडून मात्र सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडविल्याचे चित्र दिसून आले.

पोहरादेवी येथे रामनवमी निमित्त साजरा होणाऱ्या यात्रा महोत्सवात आंध्र,कर्नाटक,तामिळनाडू सह देशभरातील लाखो बंजारा बांधव हजेरी लावतात.वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे.याकरीता आतापासूनच तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या सर्व नियोजनात इतरांवर सक्ती करणाऱ्या पोलीस प्रशासनाला सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याचे चित्र पहावयास मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button