Uncategorized

उत्तर प्रदेशात गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात ७ ठार, १४ हून अधिक जखमी

गोंडा : उत्तर प्रदेशातील गोंडा शहरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, येथील दोन दुकाने जमीनदोस्त झाली आहे. या जमीनदोस्त दुकानांच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १४ हून अधिक जण गंभीररित्या जखमी झाले आहे. या जखमींना उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जिल्ह्याचे एसपी संतोष कुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटामुळे ही दुकानं पत्त्यासारखी कोसळली.

गोंडा जिल्ह्यातील वजीर गंज परिसरातील टीकारी गावात ही घटना घडली आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या गॅस सिलेंडर स्फोटात एकापाठोपाठ एक दुकाने पडू लागली. या घटनास्थळावरून १४ लोकांना वाचविण्यात आले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सात जणांना मृत घोषित करण्यात आवे आहे. सध्या पोलिस प्रशासन आणि इतर तपास यंत्रणांकडून ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button