Uncategorized

वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त दोन दिवसांपासून बेपत्ता

विरार : वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. महानगरपालिकेत मागच्या एक वर्षापासून कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रभारी पदभार प्रेमसिंग जाधव यांच्याकडे होता.

जाधव यांनी सहाय्यक आयुक्तपदावर काम करताना वसई-विरार शहरातील अनेक अनधिकृत बांधकामेही भुईसपाट केलेली आहेत. दोन जून रोजी कामावरून सुटल्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. याबाबत विरार पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमसिंग जाधव यांचे शेवटचे लोकेशन विरार रेल्वे स्थानकातले असल्याचे समजले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. जाधव हे अचानक बेपत्ता झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांना बेपत्ता केले की बेपत्ता झाले, याविषयी पोलीस तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button