आरोग्य

देशात कोरोनाचा हाहाकार! २४ तासात २ लाख ९५ हजार ४१ नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असून परिस्थिती अधिक चिंताजक बनत आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक पाहायला मिळत असून मृतांची संख्याही दिवसगणिक वाढत आहे. आता मंगळवारचे आकडे चिंतेत आणखीच भर घालणारे आहेत. मंगळवारी देशात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. इतकंच नाही तर मृतांच्या आकड्यानंही उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासात देशात दोन हजाराहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा १ लाख ८२ हजार ५५३ वर पोहचला आहे. तर गेल्या २४ तासात देशात २ लाख ९५ हजार ०४१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मागील सलग पाच दिवसांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात भलतीच वाढ नोंदवली जात आहे. मागील २४ तासात २०२३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रसार झाल्यापासून आतापर्यंत नोंदवली गेलेली ही सर्वाधिक संख्या आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, देशात आत्तापर्यंत १ कोटी ५६ लाख १६ हजार १३० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाख ६७ हजार कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात आत्तापर्यंत १ कोटी ३२ लाख ७६ रुग्ण उपचारानंतर कोरोनातून बरे होऊ घरी परतले आहेत. आत्ताच्या घडीला देशात २१ लाख ५७ हजार ५३७ अॅटिव्ह रुग्ण आहेत. तर १३ कोटी १ लाख १९ हजार ३१० देशवासियांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button