आरोग्य

गोव्यातील रुग्णालयात ऑक्सिजनअभावी १५ जणांचा मृत्यू

पणजी : देशात करोना संक्रमणा दरम्यान ऑक्सिजनची कमतरता अद्यापही कायम आहे. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनअभावी पुन्हा एकदा रुग्णांना आपले प्राण गमवावे लागलेत. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये गुरुवार-शुक्रवारच्या रात्री २.०० ते सकाळी ८.०० वाजेपर्यंत १५ रुग्णांनी आपले प्राण गमावले. ऑक्सिजन पातळी घसरल्यानं या रुग्णांचा मृत्यू झाला.

गुरुवारी रात्री १.३० वाजल्याच्या सुमारास जीएमसीमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची ऑक्सिजनची पातळी घसरत असल्याचं रुग्णांच्या नातेवाईकांनी आपत्कालीन कॉल करून कळवलं होतं. प्रभाग १४३,१४४,१४५, १४६ आणि १४९ मध्ये ऑक्सिजन संपुष्टात येत होता. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जीएमसीचे वरिष्ठ अधिकारी आणि स्कूप इंडस्ट्री (ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जीएमसीनं करार केलेली कंपनी) यांना संपर्क करण्याचा प्रयत्ना करण्यात आला परंतु, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, अशी तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी केलीय. दोन दिवसांपूर्वी याच रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २६ रुग्णांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती. उल्लेखनीय म्हणजे, गोव्यात गेल्या ३ दिवसांत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जवळपास ४१ मृत्यू झालेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button