फोकस

गुजरातमध्ये पुन्हा १२० कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त; एटीएसची कारवाई

अहमदाबाद: गुजरातमधील द्वारकामध्ये एटीएसनं मोठी कारवाई केली आहे. द्वारकामधील नवाद्रा गावात एका घरातून २४ किलोचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्याची बाजारातील किंमत १२० कोटी रुपये आहे. या प्रकरणी एटीएसनं तिघांना ताब्यात घेतलं आहे.

काही दिवसांपूर्वीच गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एका गावातून एटीएसनं १२० किलो अमली पदार्थ जप्त केले होते. त्याचं बाजारमूल्य जवळपास ६०० कोटी रुपये इतकं होतं. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसच्या हाती आज आणखी एक यश लागलं. या प्रकरणाचे धागेदोरे पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रापर्यंत जात असल्याचा दावा एटीएसनं केला. पंजाबच्या फरिदाकोट तुरुंगात असलेला भूषण शर्मा उर्फ भोला शूटर तुरुंगातूनच अमली पदार्थांचं रॅकेट चालवत असल्याची माहिती आरोपींनी दिल्याचं एटीएसनं सांगितलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवलखी बंदराजवळ असलेल्या जिनजुदा गावाजवळून जवळपास १२० किलोचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. यानंतर तिघांना अटक करण्यात आली. एटीएसनं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button