Top Newsराजकारण

सुप्रिया सुळेंसह ११ खासदारांना ‘संसद रत्न’; महाराष्ट्राचे चौघे, पैकी तीन महिला

नवी दिल्ली : प्राइम पॉइंट फाऊंडेशनने ११ खासदारांना संसद रत्न अ‍ॅवॉर्ड २०२२ साठी निवडले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, बीजदचे अमर पटनायक यांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील तीन खासदार महिलांची निवड करण्यात आली आहे.

प्राइम पॉइंट फाऊंडेशनने मंगळवारी सांगितले की संसदेच्या अर्थ, कृषी, शिक्षण आणि कामगार मंत्रालयांच्या चार समित्यांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित केले जाईल. सन्मानित करण्यात येणाऱ्या ११ खासदारांपैकी ८ लोकसभेचे आणि ३ राज्यसभेचे आहेत. हे पुरस्कार २६ फेब्रुवारी रोजी दिले जाणार आहेत. क्रांतिकारी समाजवादी पक्ष (आरएसपी) खासदार एन के प्रेमचंद्रन आणि शिवसेना खासदार श्रीरंग आप्पा बारणे (महाराष्ट्र) यांना त्यांच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘संसद विशिष्ट रत्न’ पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगता रॉय (पश्चिम बंगाल), काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा (अंदमान आणि निकोबार बेटे), आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार विद्युत बरन महतो (झारखंड), हिना विजयकुमार गावित (महाराष्ट्र) आणि सुधीर गुप्ता (मध्य प्रदेश) १७ व्या लोकसभेतील कामगिरीबद्दल त्यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

बिजू जनता दल (बीजेडी) खासदार अमर पटनायक (ओडिशा) आणि राज्यसभेतील राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया तहसीन अहमद खान (महाराष्ट्र) यांना २०२१ मध्ये सिटिंग सदस्यांच्या श्रेणीतील चांगल्या कामगिरीबद्दल सन्मानित केले जाईल. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) खासदार के के रागेश (मार्क्सवादी, केरळ) यांना त्यांच्या राज्यसभेतील पूर्ण कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘२०२१ मध्ये निवृत्त सदस्य’ या श्रेणीतील पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button