आरोग्य

मुंबई-पुण्यातून सुटणाऱ्या मध्य रेल्वेच्या १० गाड्या रद्द

मुंबईः कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने राज्यात १ मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. या स्थितीचा परिणाम मुंबई बाहेर जाणाऱ्या आणि राज्यातील विविध जिल्ह्यांमधून मुंबईत येणाऱ्या ट्रेनच्या वाहतुकीवर झाला आहे. प्रवासी संख्या रोडावल्याने मध्य रेल्वेने १० प्रवासी गाड्या १० मे पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, अजनी-मुंबई हमसफर/ दुरंतो एक्स्प्रेस, नागपूर- पुणे, दादर-शिर्डी साईनगर एक्स्प्रेस अशा गाड्या रद्द करण्यात आल्यात. करोनामुळे प्रवासीसंख्या नगण्य झाल्याने या मार्गावर आर्थिक नुकसान होत आहे. म्हणूनच रेल्वेने या ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेतला. ही माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

खालील रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत :

१).ट्रेन क्रमांक ०२१०९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मनमाड विशेष
या ट्रेनच्या फे-या दिनांक २७ एप्रिल २०२१ पासून दिनांक १० मे २०२२१ पर्यंत रद्द

२) ट्रेन क्रमांक ०२११० मनमाड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष
या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २७ एप्रिल २०२१ पासून दिनांक १० मे २०२२१ पर्यंत रद्द

३) ट्रेन क्रमांक ०२११३ पुणे-नागपूर विशेष
या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २८ एप्रिल २०२१ पासून दिनांक १० मे २०२१ पर्यंत रद्द

४) ट्रेन क्रमांक ०२११४ नागपूर-पुणे विशेष
या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २७ एप्रिल २०२१ पासून दिनांक ९ मे २०२१ पर्यंत रद्द

५) ट्रेन क्रमांक ०२१८९ मुंबई-नागपूर विशेष
या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २८ एप्रिल २०२१ पासून दिनांक ११ मे २०२१ पर्यंत रद्द

६) ट्रेन क्रमांक ०२१९० नागपूर -मुंबई विशेष
या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २७ एप्रिल २०२१ पासून दिनांक १० मे २०२१ पर्यंत रद्द

७) ट्रेन क्रमांक ०२१११ मुंबई-अमरावती विशेष
या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २८ एप्रिल २०२१ पासून दिनांक ११ मे २०२१ पर्यंत रद्द

८) ट्रेन क्रमांक ०२११२ अमरावती-मुंबई विशेष
या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २७ एप्रिल २०२१ पासून दिनांक १० मे २०२१ पर्यंत रद्द

९) ट्रेन क्रमांक ०२२७१ मुंबई-जालना विशेष
या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २७ एप्रिल २०२१ पासून दिनांक १० मे २०२१ पर्यंत रद्द

१०) ट्रेन क्रमांक ०२२७२ जालना-मुंबई विशेष
या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २८ एप्रिल २०२१ पासून दिनांक ११ मे २०२१ पर्यंत रद्द

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button