Top Newsराजकारण

लोकसभेत गोंधळ घालणारे १० खासदार निलंबित

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी १० खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. या खासदारांना कार्यकाल संपेपर्यंत निलंबित राहावं लागण्याची शक्यता आहे. लोकसभेचं कामकाज सुरू असताना गोंधळ घालणे, घोषणाबाजी करणे आणि कागद फेकणे या कारणांसाठी दहा खासदारांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मणिकम टागोर, दिन कुरिकोसे, हेबी एडन, एस. ज्योतिमणी, रौनित बिट्टू, गुरजित औजला, टीएन प्रथपन, व्ही. वैथिलिंगम, सप्तगिरी शंकर, दीपक बाज
यांचा निलंबित खासदारांमध्ये समावेश आहे.

या खासदारांनी लोकशाहीचा अपमान केला असून यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा कमी होत असल्याचा आरोप भाजपने मंगळवारी केला होता. या खासदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.

लोकसभेत गोंधळ घालण्याच्या या प्रकारामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कमालीचे संतप्त असल्याचं सांगितलं जात आहे. अशा प्रकारे एखादा खासदार जर दुसऱ्यांदा गोंधळ घालताना दिसला तर त्याला पूर्ण टर्मसाठी निलंबित करण्यात यावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

राहुल गांधींची टीका

लोकसभा आणि राज्यसभेत देशासाठी महत्त्वाच्या विषयांवर बोलूच दिलं जात नसेल, तर विरोधक घोषणाबाजी करणारच, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. पेगॅसिस प्रकरणी पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं, एवढीच आमची मागणी आहे. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणं हे विरोधी पक्षांचं कर्तव्यच आहे, असंही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button