शिक्षण

सॅमसंग स्मार्ट स्कूल उपक्रमांतर्गत ८० नवोदय विद्यालयांसाठी सॅमसंग स्मार्ट क्लासेसचा समावेश

मुंबई : भारतामधील पुढील पिढीच्या युवकांच्या सशक्तीकरणाने कमी-सुविधायुक्त विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षण देऊन #PoweringDigitalIndia च्या तीच्या स्वप्नाची पूर्ती करून तिच्या जागतिक सॅमसंग स्मार्ट क्सूल उपक्रमा अंतर्गत, सॅमसंग इंडियाने ८० नवीन जवाहर नवोदय विद्यालयांना (JNV) सॅमसंग स्मार्ट क्लासेस देण्याची घोषणा सॅमसंग इंडियाने केली आहे. या सुरूवातीमुळे, देशभरातील ८३५ वर्गांमधील ६२५ JNV शाळा आणि १० नवोदय लीडरशीप इन्स्टिटयूट सॅमसंगने सेटअप केलेले स्मार्ट क्लासेस उपलब्ध राहतील, ज्याचा ५ लाख विद्यार्थ्यांवर परिणाम होईल.

बहुतेक नवीन स्मार्ट क्लासेस फार दुर्गम भागातील ग्रामीण जिल्ह्यात सेट केले जात आहे जसेकी, जम्मू आणि काश्मिर मधील कुपवारा, गुजरात मधील डाहोड, छत्तीसगढ मधील सुकमा, पश्चिम बंगालमधील दार्जिलींग आणि आसाम मधील बाकसा. या नवीन JNV शाळा १७ राज्यांमध्ये आहेत. ग्रामीण भारतामधील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी JNV शाळा शिक्षण मंत्रालय, भारतीय शासन यांच्याकडून चालविल्या जातात. देशामध्ये सध्या ६६१ JNV शाळा आहेत.

नवोदय विद्यालय समितीच्या सहकार्याने पहिल्या सॅमसंग स्मार्ट क्सूल उपक्रमा अंतर्गत सॅमसंग स्मार्ट क्लासची स्थापना 2013 मध्ये झाली होती आणि आतापर्यंत या कार्यक्रमाचा लाभ देशातील 4.3 लाख विद्यार्थ्यांना झाला आहे. अतिरीक्त 50,000 विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल असा नवीन स्मार्ट क्लासेसचा सेटअप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शिक्षकांचे सहायक प्रशिक्षण सुद्धा चालू ठेवेल. आतापर्यंत, परिणामकारक शिकवण्यासाठी, शिक्षण देण्याचा दर्जा सुधारण्यासाठी आणि JNV ची क्षमता उभारण्यासाठी परस्परसंवादी तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा यावर 8,000 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक सॅमसंगने सेटअप केलेला स्मार्ट क्लास परस्परसंवादी सॅमसंग फ्लिप, सॅमसंग टॅबलेट, प्रिंटर, सर्व्हर, पॉवर बॅकअप आणि डीजिटल लर्निंग कन्टेंट यांनी समृद्ध आहे.

नवोदय विद्यालय समितीचे आयुक्त विनायक गर्ग म्हणाले, “NVS चे सॅमसंग सोबत फार बळकट आणि फलदायी संबंध आहेत. 2013 पासू चालू झालेल्या सॅमसंग स्मार्ट स्कूल प्रोजेक्टने आमच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना जग डीजिटल होत असतांना तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यास सक्षम केले आहे. JNV चे विद्यार्थी हे देशातील उत्तम कार्यक्षमता असलेले विद्यार्थी आहेत, आणि या कार्यक्रमामधून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांना वापर देण्यामुळे त्यांना फार मोठा लाभ झाला आहे. सध्याच्या काळात हे फार महत्वाचे ठरेल.”

सॅमसंग इंडियाच्या कॉरपोरेट सिटीजनशिपचे उपाध्यक्ष पार्थ घोष म्हणाले, “आमच्या उद्यासाठी एकत्रितपणा या नागरिकत्व ध्येयाचा भाग म्हणून सॅमसंग जगभरातील युवकांना उत्तम शिक्षण आणि अभ्यासाच्या संधी उपलब्ध करून देते. JNV मध्ये 80 नवीन सॅमसंग स्मार्ट स्कूल उपक्रमाचा भाग म्हणून स्मार्ट क्लासेस निर्माण करून पॉवरिंग डीजिटल इंडिया या आमच्या ध्येयाप्रतीची वचनबद्धता आम्ही बळकट केली आहे. हा नागरिकत्व उपक्रम भारताच्या विकास अजेंडाशी जवळून जोडला गेला आहे, आणि त्याचा व्यापक प्रसार आणि कमी-सुविधायुक्त विद्यार्थ्यांमध्ये त्याचा परिणाम होण्यासाठी शासनाच्या भागीदारीमध्ये अंमलात आणलेला आहे.”

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपल्या नवकल्पकतेचा वारसा वापरण्यासाठी सॅमसंग वचनबद्ध आहे. कंपनीच्या भारतामधील प्रमुख नागरिकत्व उपक्रम असलेला सॅमसंग स्मार्ट स्कूलचा उद्देश्य म्हणजे ग्रामीण आणि शहरी भारतामध्ये डिजीटल दूवा निर्माण करणे आणि सर्व पार्श्वभूमीमधील मूलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी देणे हा आहे.

सॅमसंग स्मार्ट स्कूलच्या सहाय्याने, विद्यार्थ्यांना व्हिज्युअल पद्धतीमध्ये गुंतवून उत्तम शिकण्याची धारणा वाढवण्यास मदत करून गणित, विज्ञान, इंग्रजी आणि समाजशास्त्र शिकविल्या जाते. JNV च्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी अभिप्राय दिलेला आहे की, सॅमसंगने सेट केलेल्या स्मार्ट क्लासेसने विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला आहे, ते स्मार्टबोर्ड, टॅबलेट आणि प्रिंटर सोबत आरामदायी आणि सहज होऊ लागले आहेत.

याव्यतिरीक्त, शिक्षकांनी हे सुद्धा सांगितले आहे की, विद्यार्थी कठिण (जटिल) संकल्पना सहजतेने शिकत आहेत आणि हे डिजीटली परस्परसंवादी वातावरण लाजाळू आणि संकोच वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गातील चर्चांमध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहन देत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button