Uncategorized
हवेत असताना बोइंग ७७७ च्या इंजिनमध्ये आग; वैमानिकाच्या सतर्कतेमुळे वाचले २४१ जणांचे प्राण

न्यूयॉर्क : अमेरिकेत रविवारी एक मोठा अपघात टळला आहे. हजारो फूट उंचीवर हवेत असताना अचानक बोइंग ७७७ चे इंजिन फेल झाले आणि काही क्षणातच इंजिनने आग पकडली. या कमर्शियल विमानात २३१ प्रवासी आणि १० क्रू मेंबर्स होते. इंजिनला आग लागल्याची कळताच पायलटने तात्काळ विमानाचे लँडिंग केले आणि सर्वांचे प्राण वाचले.
फ्लाइट डेनवरवरुन होनोलुलुकडे जात होती. डेनवर एअरपोर्टवरुन उड्डाण घेतल्यानंतर काही मिनीटातच विमानाच्या इंजिनमध्ये आग लागली. यावेळी, नॅशनल ट्रांसपोर्ट सेक्योरिटी बोर्ड (NTSB) ने घटनेच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. विमानाच्या इंजिनमध्ये आग लागल्यानंतर विमानात एकच गोंधळ उडाला. यावेळी पाटलने सर्वांना हिम्मत दिली आणि शांत केले. यादरम्यान एका प्रवाशाने इंजिनचा व्हिडिओ बनवला.