दिशा पाटनी, अनन्या पांडेच्या हॉट फोटोंचा धुमाकूळ

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सतत सोशल मिडियावर आपल्या चाहत्यांसाठी काही न काही पोस्ट करत असतात. चाहतेही मोठ्या उत्सुकतेने त्यांच्या पोस्ट फॉलो, लाईक आणि कमेंट करत असतात. सध्या अभिनेत्रींचा हॉट आणि बोल्ड लुक पोस्टचा जणू ट्रेंडच सुरु आहे. दररोज एकतरी अभिनेत्री आपल्या हॉट लुक मधले फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. सध्याच्या चर्चेतल्या नव्या दमाच्या अभिनेत्री दिशा पाटनी आणि अनन्या पांडे यांच्या फोटोंनी सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घातला आहे.
एकाच दिवशी एक नाही तर चक्क दोन-दोन अभिनेत्रींनी आपले बोल्ड अंदाजात फोटो शेअर केले आहेत. या दोन्ही अभिनेत्रींनी खूप कमी वेळेत बॉलिवूडमध्ये आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. या दोन्ही अभिनेत्री सोशल मिडियावर सतत active दिसून येतात. कधी जिमचे, कधी शूटचे तर कधी खाजगी आयुष्याचे फोटो सतत चाहत्यांसाठी शेअर करत असतात.आजसुद्धा अशाच एका पोस्टमुळे या दोघीही चर्चेत आल्या आहेत . दिशाच्या बिकिनी फोटोने चाहते पागल झाले असतानाच अनन्यानेही आपले खास अंदाजातील फोटोज आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
अनन्या पांडे खूपच कमी वेळेत बॉलिवूड मध्ये स्थिर झाली असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. चंकी पांडेची ही लेख कधी आपल्या निरागस, स्वीट फोटोंनी तर कधी बोल्ड लुकने चर्चेत येते.




