यंदाच्या उन्हाळ्यासाठी मदामेचे इको-वेअर कलेक्शन

मुंबई : मदामेचे “इको-वेअर कलेक्शन” हे नवे कलेक्शन शाश्वतता व पर्यावरणाविषयी जागृती यांच्याशी साधर्म्य साधणारे आहे. हे खास कलेक्शन ग्राहकांना जबाबदारीने शाश्वत व नैतिक उत्पादनांमधून योग्य उत्पादने निवडण्याची संधी देते. विशेष इको-वेअर कलेक्शन पुनःप्रक्रिया केलेल्या फॅब्रिकद्वारे पुनर्वापर, ऑरगॅनिक कॉटन व कमीत कमी अपव्यय यांचे प्रतिनिधीत्व करते. याबरोबरच, हे कलेक्शन तयार करताना साधेपणातील सौंदर्य विचारात घेण्यासह, आरामदायीपणा व स्टाइल यांचीही काळजी घेतली आहे. हे कलेक्शन उन्हाळ्यासाठी आदर्श असलेल्या स्मार्ट कॅज्युअलचे प्रतिक आहे.
मदामेचे कार्यकारी संचालक अखिल जैन यांनी सांगितले, “उद्योगाला व समाजाला जास्तीत जास्त फायदेशीर ठरतील, तसेच पर्यावरणावरील परिणाम कमी करतील, अशा कपड्यांचे संपादन, उत्पादन व डिझाइनिंग करण्यासाठी नैतिक व शाश्वत फॅशन हा आदर्श दृष्टिकोन आहे. डिझाइन व फॅशन या बाबतीत जराही तडजोड न करता, जबाबदार पद्धतीने व्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी मोठे योगदान देईल, असे नावीन्य वापरून तयार केलेल्या कपड्यांच्या रेंजला मदामे नेहमी उत्तेजन देते.” लिनेन महत्त्वाचे ठरत असून, इको-वेअर कलेक्शन उन्हाच्या काहिलीचा विचार करते आणि तळपत्या उन्हात दिलासा मिळेल अशी डिझाइन सादर करते. हे कलेक्शन ग्राहकांना त्यांचे रूप कस्टमाइज करण्याची, तसेच कोणत्याही निमित्ताने स्वतःचा ठसा उमटवण्याची संधी देते. इको-वेअर कलेक्शन विविध प्रकारचे फ्लोरल ड्रेस, टॉप, जॅकेट, जम्पसुट व पँट्स उपलब्ध करते. ही उत्पादने सर्व स्त्रियांना आवडतील अशी आहेत.
अखिल यांनी स्पष्ट केले, “आमच्यासाठी ‘शाश्वत फॅशन’ ही आमची विचारसरणी आहे आणि आम्ही पूर्णतः पर्यावरणपूरक फॅशन साकार करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित अशी फॅशन उपलब्ध करण्यासाठी, तसेच शाश्वत व नैतिक उत्पादने तयार करून फॅशनमध्ये निरनिराळे पर्याय आणून जागृती करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 100% पर्यावरणूरक कंपनी बनण्याच्या दिशेने वाटचाल करणे, हे आमचे शाश्वततेचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. कार्बन उत्सर्जनामध्ये किमान 80% घट करण्याचे आणि 2030 पर्यंत कार्बन-निगेटिव्ह कंपनी बनण्याचे आमचे नियोजन आहे.”