लाईफस्टाईल

ओरिफ्लेमची ‘इकलॅट अमोर व टॉजर्स’ सुगंधित उत्पादने उपलब्ध

मुंबई : ओरिफ्लेम या अग्रगण्य सोशल सेलिंग स्विडिश ब्युटी ब्रँडने महिलांसाठी इकलॅट अमोर व पुरुषांसाठी इकलॅट टोजर्स नव्या सॉफ्ट व रोमँटिक सुगंधासह पॅरिसमधील रोमान्सचा अनुभव पुन्हा जिवंत केला आहे.

इकलॅट अमोर हा फेमिनाइन ईयू दि टॉयलेटी (सौम्य परफ्यूम) असून तो मोहक आहे. प्रसिद्ध परफ्यूमर पेरी नेगरीन यांनी तो तयार केलेला असून त्यात फेमिनिनिटीमधील आनंद व तत्त्वांचा समावेश आहे. याद्वारे प्रेमात पडण्याचा आणि रोमान्स व प्रेमाचा संपूर्ण आस्वाद घेण्यास मदत होते. या सुगंधाद्वारे पीअर व फ्रेशियाच्या महत्त्वपूर्ण तत्त्वांचा उपयोग केला आहे. याच्या वापराने हृदयात व्हाइट ओरिस फुलते, ताजेपणा व स्त्रीत्वाला बहर येतो.

ताजा, नाजूक पुरुषी ईयू दि टॉयलेटी (सौम्य परफ्यूम) अलेक्झांडर व अलीएनॉर या आघाडीच्या फ्रेंच परफ्यूमर्सनी तयार केला आहे. इकलॅट टोजर्समध्ये पॅरीसमधील सदाबहार प्रेम व वसंताचा सुगंध समाविष्ट करण्यात आला आहे. मिंटचा सेन्शुअल फ्रेशनेस आणि टॉनिक नोट्स यातून निर्माण होतात. याद्वारे मोहक ऑरिसकडे तो आकृष्ट होतो. कुइरकोरॉय आणि अंबरसह पुरुषी आकर्षक तत्त्व या परफ्यूमद्वारे अधिक वृद्धींगत होतात.

ओरिफ्लेम साउथ एशियाचे रिजनल मार्केटिंगचे वरिष्ठ संचालक नवीन आनंद म्हणाले, “अमोर टोजर्सच्या सुगंधाद्वारे पॅरीसमधील वसंतोत्सवाच्या जगातील अप्रतिम रोमान्सची सैर घडवली जाते. भरपूर रोमान्सयुक्त, ताज्या फुलांचा सुगंध, प्रेमाच्या चाहुलीसह खरे प्रेम अगदी खऱ्या प्रेमाच्या स्वरुपात साजरे करा. यापेक्षा अधिक उत्कृष्ट, मोहक असे काहीही नाही. आमच्या ग्राहकांसाठी अशा प्रकारचा सुगंध सादर करताना आम्ही खूप उत्साही आहोत.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button