स्पोर्ट्स

युसूफ पठाणचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

मुंबई : टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज युसूफ पठाणने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. युसूफने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. यूसूफने त्याच्या कुटुंबियांचे, टीम इंडियातील सहकाऱ्यांचे, संघ व्यवस्थापनाचे, सर्व चाहत्यांच्याचे आणि त्याच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

निवृत्तीची घोषणा करताना युसुफ म्हणाला की, “भारतासाठी दोन वर्ल्ड कप जिंकणं आणि सचिन तेंडुलकरला खांद्यावर घेऊन जाणं हे माझ्या कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षण होते. मी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आयपीएलमध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वात डेब्यू केलं. तसेच आयपीएलमध्ये कोलकातासाठी गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोनदा विजेतपद पटकावलं, यासाठी गौतम गंभीरचा मी आभारी आहे”, असं युसूफने आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

युसूफची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
युसूफने टी 20 आणि वन डे क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध पदार्पण केलं. युसूफने टी 20 मध्ये एकूण 22 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये त्याने 146.58 स्ट्राईक रेटने 236 धावा केल्या. तसेच 13 विकेट्सही मिळवल्या. तसेच एकूण 57 वनडेमध्ये त्याने 2 शतक आणि 3 अर्धशतकांसह 810 धावा केल्या. 123 ही त्याची वनडेमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. सोबतच त्याने 33 बळीही घेतल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button