राजकारण

देवेंद्र फडणवीसांसोबत आजही चांगला संवाद : संजय राऊत

पुणे : देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपला संवाद आहेच. त्यामुळे त्यांची मुलाखत मी घेणारच असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. अर्थात ही मुलाखत केव्हा होणार हे मात्र सांगायला त्यांनी नकार दिला. याबरोबरच धोरणांवर टीका म्हणजे मोदींवर टीका नाही असेही ते म्हणाले आहेत. पूर्वीच्या सेलिब्रिटींना भान होते असं म्हणत त्यांनी सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्या ट्विटवरून निशाणा साधला.

विरोधकांनी धार्मिक राजकारण करत मंदिरे उघडायला लावली आता कोरुना रुग्णांची संख्या वाढत आहे असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे आज पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांची वेगवेगळ्या मुद्द्यांवर संवाद साधला. त्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपला संवाद आहेच. त्यांची मुलाखत होणार आहे पण पेपर न होता रिझल्ट बघायला मिळेल असं राऊत म्हणाले.

सेलिब्रिटींच्या ट्विट संदर्भात बोलताना राऊत म्हणाले पूर्वीच्या सेलिब्रिटींचा चळवळींशी संबंध होता आणि आणि त्याचं राष्ट्रीय भान होते. अजित पवार यांच्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांचा प्रभाव असून अजित पवार मास्तरांच्या भूमिकेत आहेत आणि कोरोना स्थिती चांगली हाताळत आहेत असेही वक्तव्य राऊत यांनी केले.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौरा बाबत बोलताना ,” उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यानंतर राम मंदिर बांधायला चालना मिळाली. राज ठाकरे आयोजित जातील तेव्हा त्यांना ही शिवसेनेचे काम बघायला मिळेल” राऊत म्हणाले

नेहमीप्रमाणेच विरोधकांवर तोफ डागताना त्यांनी विरोधकांनी धार्मिक राजकारण केले. मंदिरे उघडावी लागली परंतु आता जे रूग्ण वाढवत आहेत वाढत आहेत त्याचे उत्तर ते देणार आहेत का असा सवाल त्यांनी विचारला. याबरोबरच मुख्यमंत्री दूरदृष्टीचे नेते त्यांना कल्पना होती म्हणून त्यांनी हळूहळू येथे गोष्ट सुरू करण्याची भूमिका घेतली असेही ते म्हणाले. मानसी चोरायची नवीन पद्धत आली आहे त्यांनी मेट्रो मॅन श्रीधरन यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button