स्पोर्ट्स

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये राफेल नदालला पराभवाचा धक्का

मेलबर्न : टेनिस पुरुष एकेरीत विक्रमी २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या दिशेनं घोडदौड करणाऱ्या दुसऱ्या मानांकित राफेल नदालचं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान आज उपांत्यपूर्व फेरीत संपलं. ग्रीसच्या पाचव्या मानांकित स्टेफानोस सित्सिपासनं चिवट झुंज देत पाच सेटच्या थरारक सामन्यात नदालला पराभवाचा धक्का दिला आणि उपांत्य फेरीत धडक मारली.

एकही सेट न गमावता, क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेल्या नदालनं जबरदस्त खेळ करत पहिला आणि दुसरा सेट ६-३, ६-२ असा सहज जिंकला. तिथून सामन्यात कमबॅक करणं सित्सिपाससाठी महाकठीण होतं. पण, २२ वर्षांचा हा धडाकेबाज पोरगा विक्रमवीर नदालला भिडला आणि निकराची झुंज देत पुढचे तीन सेट ७-६(४), ६-४, ७-५ असे जिंकून त्यानं सामना खिशात टाकला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button