अर्थ-उद्योग

अ‍ॅमेझॉनकडून ठराविक विक्रेत्यांनाच प्राधान्य

भारतातील व्यवसायावर ´बंदी घालण्याची मागणी

नवी दिल्ली : भारतातील कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं अर्थात कैट या किरकोळ व्यापाऱ्यांच्या संघटनेनं केंद्र सरकारला अ‍ॅमेझॉनच्या भारतातील व्यवसायावर बंदी घालण्याची मागणी केली. अ‍ॅमेझॉनद्वारे भारतात व्यवसायासाठी ठराविकच व्यापाऱ्यांना प्राधान्य दिलं जात असल्याचं म्हणत व्यापाऱ्यांनी विरोध सुरू केला आहे. रॉयटर्सच्या अहवालात यापूर्वी अ‍ॅमेझॉनचे काही दस्तऐवज समोर आले होते. अ‍ॅमेझॉननं भारतीय नियामक मंडळांची फसवणूक केली आणि एक गोपनीय रणनिती तयार केली, असं रॉयटर्सच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. २०१२ ते २०१९ या कालावधीतील ते दस्तऐवज आहेत.

रॉयटर्सनं जो अहवाल प्रसिद्ध केला तो नक्कीच आश्चर्यकारक आहे. यामुळे अ‍ॅमेझॉनच्या भारतातील व्यवसायावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं केली. तसंच त्यांनी वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याकडेही भारतात अ‍ॅमेझॉनच्या व्यवसायावर बंदी घालण्यात यावी यावर त्वरित निर्णय घेण्यात यावा अशी विनंती केली.

दरम्यान, अ‍ॅमेझॉननं या संघटनेच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु अ‍ॅमेझॉननं रॉयटर्सचा अहवाल रिट्वीट करत आपण याचा निषेध करत असल्याचं म्हटलं. तसंच हा अहवाल अपूर्ण आणि तथ्यात्मकरित्या चुकीचा असल्याचंही त्यांनी नमूद केलं. अ‍ॅमेझॉन हे भारतीय कायद्यांचं पालन करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button