राजकारण

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा यशवंत जाधव

शिक्षण समितीवर संध्या दोषी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा शिवसेनेचे यशवंत जाधव यांची निवड झाली आहे. सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत यशवंत जाधव १४ मते मिळवून विजयी झाले आहेत. जाधव यांच्याविरोधात भाजपाच्या राजेश्री शिरवडकर उभ्या होत्या मात्र ८ मते पडल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. तत्‍पूर्वी, काँग्रेसच्या आसिफ झकार‍िया यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपाविरुद्ध शिवसेना अशी ही लढत झाली. एकूण २७ सदस्‍यांपैकी २२ सदस्‍यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. तर तीन जण तटस्‍थ राहिले. एक सदस्‍य गैरहजर होते. अन्‍य एक सदस्‍याला मतदानाचा हक्‍क नाही.

दरम्यान शिवसेनेच्या संध्या दोशी यांना पुन्हा शिक्षण समितीच्या अध्यक्षपदची संधी मिळाली आहे. त्यामुळे संध्या दोषी दुसऱ्यांदा शिक्षण समितीच्या अध्यक्षपद मिळाले आहे. संध्‍या दोशी यांचा १३ मते मिळवून विजयी झाल्‍या आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचे नगरसेवक पंकज यादव उभे होते मात्र यादव यांना एकूण ९ मते मिळाल्याने त्यांची अध्यक्षपदाची संधी हुकली. संध्या दोषी यांच्याविरोधातही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आशा सुरेश कोपरकर उभ्या होत्या. मात्र त्यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button