दिनो मोरिया हा मुंबई महापालिकेचा सचिन वाझे : नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : अभिनेता दिनो मोरिया याच्यावर सक्तवसुली संचलनालयाने केलेल्या कारवाईनंतर भाजप आमदार नितेश राणे शिवसेनेविरोधात आक्रमक झाले आहेत. दिनो मोरिया हा मुंबई महानगरपालिकेतील सचिन वाझे होता. याप्रकरणात आणखी खोलवर गेल्यास अनेक ‘पेंग्विन’ बाहेर पडतील. आमच्याकडे सगळ्याचे पुरावे आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला.
नितेश राणे यांनी शनिवारी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी दिनो मोरिया प्रकरणावरुन शिवसेनेला लक्ष्य केले. बॉलिवूडमध्ये चार-पाच चित्रपट करण्यापलीकडे दिनो मोरियाची विशेष ओळख नाही. मात्र, हा दिनो मोरिया मुंबई महानगरपालिकेशी संबंधित कोणतेही काम चुटकीसरशी करुन देऊ, असे इतरांना सांगत फिरतो. दिनो मोरियाची कोणाशी मैत्री आहे?, असा सवाल नितेश यांनी उपस्थित केला.
Dino is the Waze of BMC !!
If one digs more … lot of penguins will come out running..
We have the proofs!!— nitesh rane (@NiteshNRane) July 3, 2021
संदेसरा घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने अभिनेता दिनो मोरिया आणि अहमद पटेल यांचा जावई इरफान अहमद सिद्दिकी आदींवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने या दोघांची अनुक्रमे १.४ कोटी आणि २.४१ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. गुजरातमधील उद्योजक संदेसरा बंधूंनी तब्बल १४५०० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन एका बँकांना चुना लावला होता. याप्रकरणाच्या तपासादरम्यान इरफान सिद्दीकी आणि दिनो मोरिया यांचेही आर्थिक लागेबांधे असल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे ‘ईडी’कडून गुन्हेगारी स्वरुपात मोडणाऱ्या आर्थिक व्यवहाराइतक्या रक्कमेची संपत्ती जप्त केल्याचे समजते.
https://twitter.com/NiteshNRane/status/1410991312505954308




