![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/07/china.jpg)
ल्हासा : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे चिनी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव बनल्यानंतर पहिल्यांदाच तिबेटचा दौरा केला आहे. या वेळी जिनपिंग यांनी तिबेटची राजधानी ल्हासाच्या डेपुंग मठ, बरखोर स्ट्रीय आणि पोटाला पॅलेससारख्या प्रसिद्ध बौद्ध मठांना भेट दिली. पोटाला पॅलेस हे बौद्ध धर्माचे महागुरु दलाई लामा यांचे घर म्हटले जाते. शी जिनपिंग यांचा दौरा खूप महत्वाचा मानला जात आहे.
तिबेटमध्ये पुढील दलाई लामांची निवड केली जाणार आहे. जिनपिंग यांचा तिबेट दौरा अचानक ठरविण्यात आला आहे. काही वर्षांपासून चीनचे बौद्ध मठांवर नियंत्रण वाढले आहे. शाळांमध्ये तिबेटी भाषेऐवजी चीनची मंडारिन भाषा शिकविली जात आहे. तसेच चिनी सरकाच्या नितींचा विरोध करणाऱ्या किंवा विरोधात बोलणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जात आहे. दलाई लामांशी देखील संबंध असल्याचे समजले तरी देखील त्याला कठोर शिक्षा केली जात आहे.
तिबेटवर कब्जा केल्यापासून चीनची ताकद एवढी मजबूत झाली नव्हती. यामुळे जिनपिंग हे तिबेटमध्ये धर्माचे कार्ड खेळू पाहत आहेत. यामुळे पुढील दलाई लामा निवडीआधी चीन आपल्या बाजुने तिबेटी लोकांना वळवू पाहत आहे. यासाठी चीन आता पंचेन लामा यांना आपला मोहरा बनवत आहे.
दलाई लामा यांच्यानंतर तिबेटच्या बौद्ध धर्मात दुसरे म्हहत्वाचे व्यक्ती म्हणून पंचेन लामा यांचे स्थान आहे. त्यांचे पद देखील दलाई लामांसारखए पुनर्जन्माच्या सिद्धांतावर आधारित आहे. २६ वर्षांपूर्वी चीनने त्यांचे अपहरण केले होते. तेव्हा त्यांचे वय ६ वर्षे होते. ते आता ३२ वर्षांचे झाले आहेत. चीन त्यांना दलाई लामांच्या जागी आणण्याचा प्रयत्न करत आहे.
तेनजिन ग्यात्सो, हे नाव आपण ओळखत असलेल्या दलाई लामांचे आहे. त्यांचे वय ८६ वर्षे आहे. त्यांची प्रकृतीही ठीक नसते. यामुळे त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यावरून तिबेटमध्ये हालचाली सुरु आहेत. तिबेटमध्ये दलाई लामा म्हणजे एक जिवंत बुद्ध मानले जाते, जे मृत्यूनंतर पुनर्जन्म घेतात. हा नवा धर्मगुरु चीनला निवडायचा आहे.