राजकारण

परभणीतील राष्ट्रवादीच्या नेत्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप

पुणे: परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. या महिलेने गुरुवारी पुण्यात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या नव्या आरोपांमुळे महाविकासाघाडी सरकारच्या अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

राजेश विटेकर (Rajesh Vitekar) यांनी माझे अश्लील व्हीडिओ तयार करुन माझ्यावर वर्षभर अत्याचार केले. मी या सगळ्याविरोधात तक्रार केली होती. माझ्याकडे सर्व पुरावेही आहेत. पण मला केवळ तपास सुरु असल्याचे सांगितले जाते. तर राजेश विटेकर यांनी शरद पवार यांच्या पाठबळामुळे माझ्यावर गुन्हा दाखलच होणार नाही, असे सांगून मला घाबरवल्याचे या पीडित महिलेले म्हणणे आहे. यापूर्वी सामाजिक कल्याण मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या आयुष्यातील महिलेविषयी जाहीर वाच्यता केली. त्यानंतर त्यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेने ही तक्रार नंतर मागे घेतली होती. तर संजय राठोड प्रकरणही सरकारच्या अंगाशी आले होते. अखेर संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस राजेश विटेकर यांच्याविरोधात काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button