Top Newsराजकारण

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड होणार?

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरु होत आहे. तीन आठवड्यांचे हे अधिवेशन असून दुसऱ्या आठवड्यात विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. ११ मार्चला अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वीच ही निवडणूक घेण्यावर आघाडी सरकारचा भर आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा फेब्रुवारी २०२१ मध्ये राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाल्यापासून राज्य विधिमंडळाची तीन अधिवेशने पार पडली. मात्र, या अधिवेशनांमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख राज्यपालांना कळविण्यात येणार आहे.

हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आघाडी सरकारने नियमात बदल केला होता. त्यावरून एकच आघाडी सरकार आणि विरोधक भाजप यांच्यात एकच रणकंदन माजले होते. आघाडी सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठविला होता. मात्र, या प्रस्तावावर सही करण्यास राज्यपालांनी नकार दिला. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात ही निवड होऊ शकली नव्हती. विधासभा अध्यक्षपदासाठी भोरचे आ. संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत होते. त्यात आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रसचे मुंबईतील आ. अमीन पटेल यांचंही या पदासाठी चर्चेत येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button