मोदींना रोखणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या हातात भाजपचा झेंडा का होता?; काँग्रेसने ट्विट केला व्हीडिओ
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत बुधवारी एक मोठी चूक झाली. पंजाब दौऱ्यात फिरोजपूर येथे मोदींच्या उपस्थित एक मोठी रॅली होणार होती. पण निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटाने मोदींचा ताफा रस्त्यामध्येच थांबवला. एका उड्डाणपुलावर जवळपास १५ ते २० मिनिटं मोदींची गाडी अडकली होती. देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही सर्वात मोठी चूक असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. याच दरम्यान काँग्रेस आणि भाजपा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही यांनी एक व्हिडीओ ट्विट करून काही शंका उपस्थित केल्या आहेत.
The alleged 'SECURITY LAPSE' 👇 pic.twitter.com/ixXtV8H00u
— Srinivas BV (@srinivasiyc) January 5, 2022
श्रीनिवास बी व्ही यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी आंदोलकांच्या हातात भाजपचा झेंडा कसा काय? असा प्रश्न विचारला आहे. जर हे लोक आंदोलनकर्ते होते तर त्यांच्या हातात भाजपाचा झेंडा का होता? पंजाब पोलिसांनी यांना रोखलं नाही तर केंद्र सरकारच्या अख्त्यारित असणाऱ्या एसपीजी सुरक्षारक्षकांनी त्यांना गाडीजवळ का येऊ दिलं? आयबी अधिकारी कुठे होते? ते मोदी जिंदाबादच्या घोषणा का देत होते? असे प्रश्न श्रीनिवास यांनी आपल्या ट्विटमध्ये विचारले आहेत.
अगर ये लोग प्रदर्शनकारी थे:-
◆ तो हाथों में BJP का झंडा क्यों था?
◆ अगर पंजाब पुलिस ने इन्हें नही रोका, तो फिर केंद्र सरकार के अधीन आने वाली SPG सुरक्षा ने इन्हें गाड़ी के करीब क्यों आने दिया,
◆ IB के अधिकारी कहाँ थे?
◆ ये मोदी जिंदाबाद के नारे क्यों लगा रहे थे? pic.twitter.com/0lgOCeI1Q3— Srinivas BV (@srinivasiyc) January 5, 2022
श्रीनिवास यांनी याआधी ‘Modi ji, How’s the Josh? #Punjab’ असं ट्विट केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यांच्या या ट्वीटमुळे पंजाब सरकारवर अनेकांनी संशय़ व्यक्त केला. तसेच पावसाचा आणि त्यामुळे सभेच्या ठिकाणी उडालेल्या गोंधळाचा व्हिडीओ देखील श्रीनिवास ट्विटरवरुन शेअर केला होता. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. भारताच्या इतिहासात आज पंजाबच्या पुण्यभूमीवर काँग्रेसचे खुनी हेतू अयशस्वी ठरले. काँग्रेसमधील जे लोक मोदींचा द्वेष करतात, ते आज देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या सुरक्षेला कशाप्रकारे भंग करता येईल, यासाठी प्रयत्नशील होते, असं म्हणत स्मृती इराणी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
Modi ji की घर वापिसी की असली वजह ये है,
बाकी दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है…!न दूल्हा आया, न बाराती आये और न शहनाई बज पायी pic.twitter.com/y6E6KmIrYy
— Srinivas BV (@srinivasiyc) January 5, 2022