Top Newsराजकारण

अनंत करमुसेला मारहाण का झाली; कारण आले समोर…

मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ज्या अनंत करमुसे अभियंत्याला बेदम मारहाण प्रकरणी अटक आणि त्यानंतर जामिनावर मुक्तता झाली. त्यामागे नक्की काय कारण होते याचा एका वृत्तसंस्थेने शोध घेतला असता सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय नेत्यांची बदनामी आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा अर्धनग्न फोटो कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

शिवप्रतिष्ठानचा अध्यक्ष असलेल्या अनंत करमुसे याने २०२० साली फेसबुकसह सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाडांचे अर्धनग्न आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मौलवीच्या रुपातील फोटो अपलोड केलेले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करमुसेला मारहाण केली होती. यावरूनच जितेंद्र आव्हाड यांना गुरूवारी अटक झाली. अनंत करमुसे याने यापूर्वी २०१७-१८ मध्ये फेसबुकवरून शरद पवार यांचा शरदुद्दीन आणि जितेंद्र आव्हाड यांचा जितुद्दीन या नावाने उल्लेख करत ट्रोल केले होते. २०१८ पर्यंत तो आव्हाड यांना सातत्याने ट्रोल करीत होता. २०१८ मध्ये आव्हाडांनी त्याला ट्विटरवरून ब्लॉक केले. त्यानंतरही तो फेसबुकवरून आव्हाडांना ट्रोल करत होता, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितिन देशमुख यांनी सांगितले. २०२० मध्ये आव्हाडांचा नग्न फोटोही फेसबुकवर टाकला.

पवारसाहेब आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचेही मौलवीच्या रुपातील फोटोही अपलोड त्यांने केले. यामुळे कार्यकर्त्यांचा राग अनावर होऊन त्यांनी करमुसेला मारहाण केली होती. या पोस्ट बघितल्यावर कुणालाही रागच आला असता असेही देशमुख म्हणाले.

हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर न्यायाधीशांनीही नाराजी व्यक्त करत यालाच व्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात का, असा प्रश्न उपस्थित केला होता.करमुसे हा त्याच्या विकृत स्वभावामुळे राज्यातील नेत्यांची बदनामी सोशल मीडियावर वारंवार आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे. अटक झालेल्या आव्हाड यांची भाजपकडून राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, सप्टेंबर महिन्यात महाडमध्ये एका प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याने अटक करून जामीनावर सोडण्यात आले होते. तेव्हा कोणीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही किंवा भाजपनेही त्यांचा राजीनामा घेतला नाही, याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. करमुसेला मारहाण झाल्याचे समर्थन नाही. मात्र, भाजपकडून करण्यात येणारी आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी ही अवाजवी असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button