Top Newsराजकारण

आ. नितेश राणेंची खिल्ली उडवताना नवाब मलिक म्हणतात, ‘पैहचान कौन?’

मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस कॉपी आणि माफीने गाजला. आमदार भास्कर जाधव यांनी मोदींची केलेली नक्कल पहिल्या दिवशी चर्चेत होती. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्याविरुद्ध आपण हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचा मुद्दाही गाजला. त्यानंतर, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरेंची एंट्री होताना आमदार नितेश राणेंनी त्यांची उडवलेली खिल्ली महाराष्ट्रभर व्हायरल झाली. आता, नितेश राणेंना महाविकास आघाडीकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. शिवसेनेनंतर मंत्री नवाब मलिक यांनी फोटो शेअर करत नितेश राणेंची खिल्ली उडवली आहे.

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दुसऱ्या दिवशी सभागृहात जात असताना आमदार नितेश राणे हे विधानसभेच्या पायऱ्यावर इतर भाजप सदस्यांसमेवत बसले होते. त्यावेळी, नेमकं आदित्य ठाकरे पायरी चढून वर जात असताना, नितेश राणेंनी त्यांच्याकडे पाहून म्याव, म्याव… असा आवाज काढला. नितेश राणेंच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. आता, राणेंच्या या व्हिडिओला पाहिल्यानंतर शिवसेनेनंतर आता मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलंय. नवाब मलिक यांनी एक वेगळाच फोटो शेअर करत नितेश राणेंची खिल्ली उडवली.

मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कोंबड्याचा फोटो शेअर केला आहे. मात्र, या कोंबड्याचा चेहरा मांजरीसारखा दिसून येतो. म्हणजेच, हा कोंबडा मांजर मिश्रित असून हा फोटो कॉकटेल असल्याचं म्हणता येईल. मंत्री मलिक यांनी नितेश राणेंनी एकप्रकारे खिल्लीच उडवली आहे.

शिवसेनेचा टोला

”मांजर आडवं गेले तरी थांबू नये, ही प्रबोधनकारांची थोर शिकवण महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तंतोतंत पाळली!”, असे ट्विट शिवसेना आमदार डॉ. मनिष कायंदे यांनी केलं आहे. त्यासोबतच, म्याव.. म्याव… हा हॅशटॅगही त्यांनी वापरला. नितेश राणेंच्या कृत्यावर आता शिवसेनेनंतर राष्ट्रवादीकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button