फोकस

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात विदर्भासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई व नागपूर येथील कार्यालयांद्वारे जारी केलेल्या हवामानाच्या इशाऱ्या नुसार राज्यात पुढचे ३ दिवस मुसळधार पाऊस होऊ शकतो. खास करून मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात जोर जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातापासून विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा जोर धरला आहे. राज्यात मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने मागील काही दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. यात पुढील दोन-तीन दिवसात हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागानं शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. हवामान विभागानं मराठवाडा विभागात मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याप्रमाणं पावसाच्या सरी कोसळल्यास शेतकऱ्यांची पिकं वाचतील, असं हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी सांगितलं आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असल्यानं त्याच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन ते चार दिवसात असल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button