किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर विलासराव देशमुखांचा परिवार

लातूर: भाजप नेते किरीट सोमय्या सध्या लातूर दौऱ्यावर आहेत. लातूरमध्येही किरीट सोमय्यांनी साखर कारखान्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन अजित पवारांवर आरोप केले. मात्र, लातूरमध्ये किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर यावेळी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. विलासराव देशमुख आणि त्यांच्या परिवारानं ज्या ज्या साखर कारखान्यांचा व्यवहा केला आहे त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याच किरीट सोमय्या म्हणाले. सोमय्यांनी यानिमित्तानं शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ काँग्रेस नेत्यांकडं मोर्चा वळवला आहे.
लातूरमधील साखर करखान्याच्याव्यवहाराची चौकशी करून डिसेंबरअखेर भ्रष्टाचार समोर आणणार आहे. विलासराव देशमुख आणि त्यांचा परिवार यांनी देखील ज्या साखर कारखान्याचे व्यवहार केले आहेत त्याची मी चौकशी करण्याची मागणी करणार आहे. माफिया पद्धतीने लातूर जिल्हा बँक काँग्रेसने ताब्यात घेतली, असल्याचा आरोप सोमय्यांनी केला.
नवाब मालिकाच जे सुरू आहे ते चुकीचं आहे. खूप घाई सुरू आहे. क्रांती रेडकरने हिंदू पद्धतीने लग्न केल्याचा फोटो टाकल्यानंतर नवाब मलिक चिडले असावेत. कोणाचं खासगी आयुष्य असं समोर आणण्याचा अधिकार मालिकांना आहे का? हिंदुत्वाचा अपमान सहन करणार नाही. समीर वानखेडेची चूक असेल तर ती समोर येईलच. ही केस सुरू आहे मात्र कोणाचं खासगी आयुष्य असं समोर आणू नका, असं सोमय्या म्हणाले.
मी फक्त घोटाळे भ्रष्टाचार याबद्दलच बोलणार आहे, शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर आयटीच्या छाप्यावरून जे सुरू आहे, त्याच्यावरून लक्ष हटवण्यासाठी नवाब मालिकांच काम सुरू आहे, नवाब मलिक यांच्याकडे जे खात आहे, त्याबाबत त्यांनी बोलावं. क्रूझ पार्टी प्रकरण कोर्टात सुरू आहे त्यात जे समोर येईल ते येईल. ईडी आणि आयटीच्या चौकश्या वरून लक्ष हटवण्यासाठी नवाब मलिक बोलत आहेत. कोविड मध्ये मुंबई महापालिकेने मृत्यू लपवले हा भ्रष्टाचार काढला होता. कोविड सेंटरच्या जेवणातही भ्रष्टाचार झाला. आता पर्यंत मी केलेले आरोप कधीच खोटे ठरलेले नाहीत, असं किरीट सोमय्या म्हणाले. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र हे माझं लक्ष असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.