मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक तारिक शाह यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शाह यांचं निधन झालं आहे. शनिवारी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.

बॉलिवूड फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या सोशल मीडियावर तारिक यांच्या निधनाची बातमी दिली आहे. “दु:खद बातमी. कडवा सच टीव्ही सीरिअल आणि जनम कुंडली फिल्मचे अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शाह यांचं सकाळी निधन झालं. मुंबईतील खासगी रुग्णालया निधन झालं”, असं ट्वीट विरल भयानीने केलं आहे. तारिक शहा हे अभिनेत्री शोमा आनंद यांचे पती. त्या दोघांनाही एक मुलगी आहे. त्यांना किडनीचा आजार होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. ते डायलेसिसवर होते.

बहार आने तक, मुंबई सेंट्रल, एहसास, गुमनान है कोई अशा फिल्मसाठी तारिक यांना ओळखलं जायचं. त्यांनी जनम कुंडली, बहार आने तक अशा फिल्म आणि कडवा सच ही टीव्ही सीरिअल दिग्दर्शित केली. निर्मितीचं कामही त्यांनी पाहिलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button