वरुणा ग्रुपची भारतातील उत्कृष्ट कामगिरीची २५ वर्षे पूर्ण
मुंबई : भारतातील आघाडीची लॉजिस्टिक कंपनी वरुणा ग्रुपने भारतातील वितरण साखळी क्षेत्रात २५ वर्षे पूर्ण केली. स्थापनेपासून कंपनीच्या संस्थापकांनी कामकाजातील उत्कृष्टतेला प्राधान्य दिले. ग्राहक केंद्रितता, पारदर्शकता आणि टेक्नोलॉजी फर्स्ट दृष्टीकोनाद्वारे सतत सुधारणेसाठी कंपनी प्रेरीत असते.
१९९६ मध्ये श्री विकास जुनेजा आणि श्री विवेक जुनेजा या दोन बंधूंनी बरेली येथे वरुणा ग्रुपची स्थापना केली. त्यावेळी केवळ दोन ट्रकपासून कामकाज सुरु केल्यानंतर आजया कंपनीला पुरवठा साखळी लीडर्समध्ये भागीदारीकरिता पहिली पसंती दिली जाते. लॉजिस्टिक कामांकरिता प्रभावी व्यवस्थापन आणि उत्पादनांचे प्रभावी लँडिंग करण्याची कमी किंमत याकरिता लोक कंपनीवर विश्वास ठेवतात. लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसिंग या व्यवसायातील दोन प्रमुख क्षेत्रात ही कंपनी काम करते. वरुणा ग्रुप मजबूत डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बळावर १८०० पेक्षा जास्त वाहनांद्वारे देशातील सर्वात मोठे ड्राय कार्गो कंटेनर फ्लीट चालवते. ते भारतातील १.२ दशलक्ष चौरस फुट आकाराचे २५ पेक्षा जास्त वेअरहाऊस व्यवस्थापित करते.
वरुणा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक व संस्थापक श्री विवेक जुनेजा म्हणाले, “उत्कृष्टता प्रदान करण्याची ही अविश्वसनीय २५ वर्षे ठरली. ग्राहक आणि इंडस्ट्रीच्या मागणीनुसार वरुणा ग्रुपने सातत्याने परिवर्तन घडवून आणले. या यशात मदत करणाऱ्या घटकांपैकी महत्त्वाचे म्हणजे ऑटोमेशन आणि तंत्रज्ञानात आम्ही केलेली गुंतवणूक. उदा. पॉलीगॉन जिओफेन्सिंगद्वारे आम्ही आमच्या ड्रायव्हर्सवर सतत लक्ष ठेवून असतो. याद्वारे प्रभावी वाहन ट्रॅकिंग केले जाते. तसेच समर्पित ड्रायव्हर अॅप्लिकेशनद्वारे मॉनिटरींग केले जाते. लॉजिस्टिक क्षेत्रात वाहन हा पाठीचा कणा असतो, त्यामुळे ओईएमसोबत भागीदारी करत आम्ही त्यांच्या पारंपरिक आणि काळानुरुप देखभालीवर भर दिला आहे.”