मुंबईत उद्यापासून ३ दिवस नोंदणीशिवाय लसीकरण : किशोरी पेडणेकर

मुंबई : राज्याला ८ लाख ७० पेक्षा अधिक डोस मिळण्याची शक्यता आहे देशभरात मोफत लसीकरण सुरु झाले आहे. तरुणांच्या लसीकरणाला ब्रेक लागला हे नक्की आहे. यामुळे खासगी सेंटरमध्ये श्रीमंतांनी हजारो रुपये मोजून लस घेतली आहे. मुंबईकर आणि राज्यातील नागरिकांचे मोफत लसीकरण पार पाडण्याच्या टप्प्यात आलो आहे. राज्य सरकार आणि पालिका प्रशासन लीसकरण करत आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार वॉक इन लसीकरण म्हणजेच नोंदणीशिवाय लसीकरण होणार तर गुरुवार शुक्रवार शनिवारी नोंदणी करुन आणि वॉक इन लसीकरण सुरु असल्याचे मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
घरोघरी लसीकरण नाही ५ ते १० मीटरच्या जसे आरोग्य शिबीरे घेतो तसे लसीकरण कॅम्प सोसायटी सोसायटीमध्ये झाली पाहिजे. तसच जर लसी केंद्र सरकारकडून मिळाले तर राज्य सरकार लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु करेल असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
आजच्या घडीला प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये एक लसीकरण सेंटर हवं आहे. आता एका नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये १ ते २ लसीकरण केंद्र तयार करण्यात आल्या आहेत. ज्या नगरसेवकांच्या कक्षामध्ये ज्या आमदार आणि खासदार यांनी मिळून जी केंद्र तयार केली आहेत. या केंद्रांमध्ये द्यायला हरकत नाही. ज्यांना सोसायटीमध्ये लसीकरण करायचे आहे आणि ते काळजी घेणार असतील तर तांना संपर्क करुन किती लोकांना जाणार आणि माहिती घेऊन केले तर जास्त लसीकरण होईल. उद्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु होणार आहे. रिक्षावाले, फेरीवाले यांना प्राधान्याने लस देण्यात येणार असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.




